पाणवठा

नवचैतन्य टाईम्स वाई(प्रतिनिधी)श्री राम ओढ्याच्या काठावर बापू ड्रायव्हरचा व गोसावी बापू यांचा मळा चांगलाच बहरला होता निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ऊसाचे फड ओढ्या तील गोड्या पाण्यावर पोषले जात होते.पहाटे पडणारे दवांचे मोती सुर्य किरणांच्या नांदी लागुन ऊसाच्या पानावर झगमगत होते. वाव दिड वाव उंच पांढरे धोट तुरे वाऱ्यावर हळुच फडकत व मागे पुढे डुलत होते.शेतांच्या कडेने लाल भडक राम फळांच्या ओझ्यांनी झाडे सदैव वाकलेली होती.अनेक नोटांची उधळण केल्या प्रमाणे चिंच,करंज,वड,व पिंप ळाच्या पानांची पानगळ वाऱ्यावर थरथरत गिरक्या घेत जमिनीवर उतरत होती. वाळलेल्या रुईटीच्या कोयरीतुन पांढऱ्या शुभ्र म्हातारीचे पुंजके हवेत तरंगत ओढ्यातील वाहत्या प्रतिबिंबाला स्पर्श करत होते.ओढ्याच्या कडेने पर्ण हीन अनेक झाडे कवायतीला उभ्या राहिलेल्या शाळेतील मुलांसारखी गप्प उभी होती. दुर वर काही मुले वाळलेल्या व भिज लेल्या पानातुन करंज्या शोधत फिरत होती. निर्गुडी,घाणेरी,शेंबा रटी,व बाभळीच्या झुडपांचे गच पान माजले होते.मात्र लाल रंगा ची कण्हेरी ओढ्यातील पात्रात चांगलीच
फोफावली होती.तेथील मोठ्याल्या चिंचेवर वानरे व त्यांची लहान लहान पिल्ले बिन धास्तपणे तोल सावरुन उंडारत होती.वटवाघुळांचे चित्कार ओढ्यात पसरत होते.पक्षांचे थवे निळ्या आकाशातुन गुंजारव करीत उडत होते.शेजारील अनेक नांगी शेराला गारवेलींनी गुंरफुटुन झाकुन टाकले होते.आणि त्यांच्या आत काळ्या कुळुळीत पण लाल डोळ्यांच्या कोकिळा पक्षांच्या घरट्यातुन कुहूची हाक राम ओढ्यात उमटत होती.डोहावर बापू माळ्यांच्या इंजिनचा आवाज वरच्या व मधल्या पाणवठ्यावर सतत घुमायचा.वरच्या पाणवठ्या वर केळीचे घड उतरुन फक्त हिरवेगार केळीचे ताजे खुंट कापुन टाकलेले होते. नारायण भाऊजीं चा अनिल,सुनिल, रघु तात्याचा कुमार,अब्बास भाईंचा दिलावर, माळ्याचा चिम्या,दाऊद भाईंचा इकबाल,पांडु दिनकरचा बाळ कृष्ण,टेकावला एकनाथ व मच्छिंद्र, संदेश शेडगे, शिवदास कारंडे,दादा इंगळे, दत्तु निकम, दादा पाटलाचा राजु,निव मामाचा दिपक व रामोशाचा जनार्दन,आणि बनेखानचा कासम हे सर्वजण केळीचे सोपाट सोलुन त्यांच्या दशा मांडीवर व नडगीवर हाताने वळूनआसुड बनवून पाण वठ्यावर एकावर एक असे हवेत बार वाजवत होतो.त्याचे पडसाद साऱ्या पाणवठ्यावर उमटत होते. गोसावी बापुंच्या वडाखाली ओढ्याच्या कडेला पाण्यासाठी फुटके एकच टिपाडं पुरलेली होते.त्या मध्ये काचेसारखे स्वच्छ, पारदर्शक पाणी,निळ्या आभाळा चे प्रतिबिंबाशी खेळत होते. गावा तील माणसांची वर्दळ पाण्यासाठी व आंघोळीच्या कारणाने दिवसभ र् चालत होती. नामु कोळी,शिवा कोळी, भानु कोळी,रघुकोळी यांच्या कावडीला बांधलेले घुंगरू तालात एक सारखे वाजत होते. पावणा कोळ्यांचा छकडा पाण वठ्यावरुन पाणी नेताना बराच काळ वाळुत रेंगाळत होता. ढगळी खाकी चड्डी व अंगात निळी पैरण घातलेला पांगा किसन पितळेचा हंड्याने पाणी भरताना स्वतःशी गुणगुणत होता.दिवसा दहा अकराच्या दरम्यान नवा वाड्यातील बुलंद शरिरयष्टीचे बंडु नाना धोतरावरच बादलीतील पाण्याने अंघोळ करताना दिसत होते.राम कुंडाला सीता कुंडाला लक्ष्मण कुंडाला असे म्हणुन डाव्या व उजव्या खांद्यावर वारं वार पाणी ओतुन घ्यायचे व आंघो ळ झाल्या नंतर ते वडाखाली निवांत बसुन अनेक देवांना लट केच जेवायला बोलवत होते. अने क पदार्थांची नावे घेऊन आग्रहाने वाढायचे. त्यांची ही मानस पुजा मला खरोखर वाटत होती. थोड्या च वेळाने मुजावर आळीचे, डोकी स पटका,अंगात दोन बटनाची पांढरी पैरण,आणि कमरेला धोतर नेसलेले बंडू घाडगे बादली व देवा चा तांबडा गडवा घेऊन अंघोळी आहेसाठी नियमा ने पाणवठ्यावर येत होते.आंघोळीनंतर चाफ्याच्या झाडा जवळच्या शिवालयात ते नियमाने व भोळ्या मनाने जल अर्पण करीत होते.व कण्हेरीची लाल कोमल फुले शिवाला वाहत होते.त्यांच्या कपाळा वर नेहमी उगवलेल्या चांदणी लाकडाचां गंध लावलेला असायचा.बापु मास्तरा ची शिवभक्ती कडक व उग्र स्वरु पाची होती.ऐन थंडीच्या दिवसात पाणवठ्यावर गार पाण्यानेअंघोळ करीत होते.ऊन वारा व पावसात त्यांनी कधीच खंड पडुन दिला नाही. आम्ही दहा पंधरा जण मुले नंदी डोहात धडाधड उड्या घ्याय चो व बराच उशीर पोहत बसायचो.मधल्या वाड्यातील जयसिंग दादांची गुरे ओढ्यातुन डोहाच्या दिशेने इरड करत आले ली पाहून सर्वजण डोहातुन बाहेर उधळाय चो. आपापले कपडे गोळा कर ण्यासाठी धडपडत होतो.म्हैस भली मोठी तुफान हत्ती सारखी होती.तीची विस्तारलेली शिंगे तलवारी सारखी टोकदार व डोळे खुनशी वाटत होते.दादा इंगळे याचे कपडे काठावर तसेच होते.तो पर्यंत म्हशीने दोन बटना ची पैरण नाकाने हुंगुन दुसऱ्या क्ष णात तोंडाने उचलुन निवांतपणे डोळे झाकुन,मान हालवत चघळा यला सुरुवात केली होती.अखेर आक्की पैरण गिळंकृत केल्यावर ती डोहात हत्तींनी सारखी उतरत आत शिरायची.तो गुरांचा तांडा रानात निघुन गेल्यावर आम्ही पुन्हा नंदी डोहात धडाधड उड्या मारत बसायचो.बापू माळ्याच्या चिंचे खालुन विजु फायटर ओढ्या च्या दिशेने चालत येत होता. पांढरा लेंगा आणि निळसर पैरणीत तो मावत नव्हता.बेडर स्वभावामुळे त्यांच्या नादी कोणीही लागत नव्हते.एक म्हैस व रेडकु घेऊन तो पाणवठ्या वर येताच सर्वत्र भितीदायक वाता वरण तापायच. इंजिनच्या आवा जाने म्हैस व रेडकु एकाएकी बिथ रले व अनाहुतपणे उधळले. त्यांना अडवण्यासाठी विजु फाय टर ओढ्यातुन पाण्यातुन वेड्या सारखा हातांच्या मुठी आवळून धावत सुटायचा.अखेर म्हैस कशी तरी खोल डोहात उतरली पण रेडकू मात्र हाती लागत नव्हते. ओढ्यातुन ते एक सारखे बिचारे धावतच हुलकावणी द्यायचे. कितीही आडवण्याचा प्रयत्न केला तरी,ते निसटून पळुन जायचे विजु फायटरने त्याला जीवाच्या आकांताने अखेर वाळु मध्ये गाठले.दोन्ही गुडग्यामध्ये धरुन नाकावर जोरजोराने फायटीं मारु लागला.त्याचे मागचे व पुढचे पाय दात ओठ खाऊन हाताने,घट्ट पकडून गुडग्या एवढ्या पाण्यात अत्यंत रागाने पाच दहा मिनिटे दाबुन ठेवले. नंतर मेलेले रेडकू सर्व ताकदीनिशी बाहेर फेकुन दिले होते.भर दुपारी शिवा नाना आणि सुंद्रा माळणीचा वरच्या वळणातल्या डोहाच्या आस पास कोणीही फिरकत नसे.ओढ्याच्या दोन्ही काठावर करंज,लेंडी जांभळ, कळकाची बेटे, आंबा, हिंगण बिटके, बोरी,बाभळ व पिंपरणीची,मोठ मोठी झाडे वाढली होती.त्या मधुनच केत काड,घायपात,निर्गुडी, शेंबारटी व घाणेरीची काटेरी घनदाट झुडपे माजलेली होती.तेथील पडक्या जुन्या काळातील अर्धवट मातीने बुजत असलेल्या विहिरीतुन सर्प, विरोळे, मोठ मोठ्या तांबुस रंगा च्या वाव दिड वाव लांबीच्या धाम णी अडचणीतून वाळुला उन्हात येऊन बसायच्या.चिम्याच्या पिंप रणीच्या बुडक्यात दोन जुग्मे पिंगा घालुन चढाओढ करीत असलेली झटापट आम्ही जवळुन पहात होतो.घडशी समाजातील काट कुळं व काळाकुट्ट म्हातारा लंगो टीवर वरच्या धारेवर अंघोळ करा यचा.आम्हाला वाटायचे तो सैदुबु वाच भुतच आहे.मग आम्ही कप डे अंगामध्ये घालुन साळसुद पणे घरी यायचो. तिसऱ्या पाणवठ्याव रील इनामातील डोह भयानक खोल होता. बाळसेदार वळण घेऊन वहात असलेला पाण्याचा प्रवाह डोहा मध्ये भवरे निर्माण करुन विरघ ळून जायचा.या डोहा वर गावची मुले नेहमी पोहत असा यची.पुरुष दिड पुरुष खोल अस णारे पाणी कधी कुणाचा जीव घेईल असे कधीच वाटले नव्हते. कोणे एके काळी पाऊस हा वेळे वर व प्रामाणिकपणे कोसळाय चा.रामेश्वराच्या डोंगरावर तो काळ्या कभिन्न ढगांची फौज घेऊन विजांच्या झग मगाटासह गायरानात उतरायचा. रेवलकर वाडी पांढरवाडी, बिटलेवाडी, विसापूर या परिसरात पावसाळी पाऊस धुवाॅधार रातवा धरुन चोहोबाजूंनी कोसळत होता. श्रीराम ओढ्याला गढुळ पाण्या च्या मोठं मोठ्या लाटा उसळत होत्या. त्या लाटेवर झाडे फांद्या आबाळ गबाळ ,केंजाळ वहात जायचे. पाणी ओसरले तरी आठवडाभर पाण्याची धार सतत वाहत होती. गावातील मुलांना त्यांचे पालक ओढ्यावर व नदी कडे बिलकुल फिरकू देत नव्हते. एक दिवस सकाळी अकरा बारा च्या दरम्यान मधल्या पाणवठ्या वर अनेक महिला वडाच्या झाडा खाली दगडी चिपेवर धुणे धुवत अस ताना,सिताराम वडाऱ्याची गजी दिवसभर पाण्याच्या धारेत वहात वहात जायची व पुन्हा पाणवठ्या वर येऊन पाण्या बरोबर तरंगत जायची.आणि गजी एका एकी पाण्यात अदृश्य झाली. साऱ्या पाणवठ्यावर एकच गोंधळ व आवई उठली. सित्या वडाऱ्याची गजी इनामाच्या डोहात बुडाली. बघता बघता ही बातमी गावात पसरली.त्या बात मीने गावात नुसता कल्लोळ उठत होता.महिला पुरुष इनामातील पाणवठ्यावर जमा होत होते. गावातील पट्टीचे पोहणारे पाच सहा पोक्त नागरिक डोहात धडा धड उड्या हाणत होते व बुडी घेऊन तळात जाऊन शोध घेत होते.यामध्ये चौकातील जित्याचे वडील श्री राजाराम गुजर,भाव गुजर, रामा कुसा,देना तुपे,जना बुवा,गोरख माने,दादा पाटील व विठुबा आप्पांच्या वाड्यातील गोविंद नाना यांनी एकतास पाण्या त बुड्या देऊन शोध चालु ठेवला होता.तरीही बुडालेल्या गजीचा शोध लागत नव्हता. तो पर्यंत सिताराम वडारी त्यांची बायको, लक्ष्मण,ओठं तुटलेला रघु व राजु, या मुलांनी ह्दय पिळवटून टाकणा रा आकांत आठवला की,मनाचा अजुनही कोंडमारा होतो. त्यांच्या आक्रोशाने पाणवठ्यावर बायका व पुरुष माणसे दु:खाने रडत होती. काळोखेच्या वस्तीवरील वेडा महाद्या चावडी जवळ येऊन गप्प उभा राहिला होता.तो ही माणसाच्या मागे मागे पाणवठ्या वरआला.तो येताच लोकांनी त्याला दूर हाकलले.तरीपण तो डोहाच्या काठावर जाऊन पोह चला. पाण्यातील लोकांना त्याने बाहेर यावयास सांगितले.व मोठ्याने हातवारे करीत डोहाची एक बाजू दाखवुन तेथेच शोध घेण्याचा आग्रह धरु लागला. बाकीचे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. पाण्यातुन सर्वजण ओलेत्यानेच बाहेर आले. राजाराम गुजरातने येड्या महाद्या च्या सांगण्यावरुन डोहात सुळका मारुन तळाशी तपासणी सुरु कर ताच तेथील साचलेल्या गाळात गजीचा पाय अनावधानाने हाता शी लागला. राजाराम गुजराने प्रेत उचलुन पाण्याच्या बाहेर काढताच आईवडिलांनी व भावंडानी फोडले ला हंबरडा अवघ्या पाणवठ्यावर गाजत होता.आणि वेडा म्हाद्याची भविष्य वाणी दोनवेळा खरी ठर लेली होती.याचा मी साक्षीदार आहे.काळाच्या ओघात ती झाडे, ते खोल डोह व पाणवठे जाग्यावर राहिलेले नाहीत.गावाकडे गेलो की ही खंत जीवन भर मनाला वेदना देते आहे.आणि जुणी
जाणती माणसे ही काळा बरोबर
निघुन गेलेली आहेत.
प्रा.संभाजी लावंड.वाई

error: Content is protected !!