ऑल जर्नालिस्टस अँड फ्रेंड्स सर्कल’चे कोल्हापुरात २७ डिसेंबरला राज्यस्तरीय संमेलन

नवचैतन्य टाईम्स सांगली प्रतिनिधी(नजीरभाई चट्टरकी)-राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना अर्थात ऑल जर्नालिस्टस अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेचे १७ वे महाराष्ट्र प्रदेश संमेलन २७ डिसेंबर रोजी करवीर नगरी कोल्हापुर येथे भरविण्यात येत आहे. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील संघटनेचे कर्तव्य दक्ष होतकरू पत्रकारांचा व पत्रकार मित्रांचा सन्मान करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्याती चे पत्रकार मा.जतीन देसाई यांच्या हस्ते प्रदेश संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मा.सचिन परब यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेल्या प्रदेश संमेलनामध्ये माहिती व जलसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ.संभाजी खरात यांचे उपस्थित पत्रकार मित्रां करिता’बदलती पत्रकारिता आणि आव्हाने’यासह अन्य विषयांवर प्रमुख मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज स्मारक या ठिकाणी हे प्रदेश संमेलन होणार आहे.ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल परिवारातील सदस्य, पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल,संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी,प्रदेश अध्यक्ष कांचन जांबोटी ,प्रदेश कार्याध्यक्ष नीलेश पोटे विदर्भ कार्याध्यक्ष राहुल कुलट,सचिव गणेश गोडशे,महाराष्ट्र प्रदेश संघटक दिनकर पतंगे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश पाटील, सांगली, प्रदेश संघटक मच्छिंद्र ऐनापुरे, दै.श्रीगोंदा सिटिझन्स चे संपादक आमीन शेख,नवचैतन्य टाईम्स चे संपादक सदाशिव माळी,टीव्ही न्यूज मराठी वाहिनीचे संपादक नजीरभाई चट्टरकी,यांनी केले आहे.

error: Content is protected !!