वज्रवाड ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर भाजपची एक हाती सत्ता काँग्रेसचा दारून पराभव

नवचैतन्य टाईम्स वज्रवाड/वार्ताहर:(सिदगोंडा खलाटी) जत तालुक्यातील वज्रवाड ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली.यात भाजप प्रणित पॅनलने सरपंच उमेदवार व सात सदस्य जिंकून काँग्रेस प्रणित पॅनलेचा धुव्वा उडवीत ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता स्थापन केली .
ग्रामपंचायत निवडणूक नऊ सदस्य व एक सरपंच जागेसाठी पार पडली. भाजप प्रणित श्री पांडुरंग ग्रामविकास शेतकरी परिवर्तन पॅनेल विरुद्ध काँग्रेस प्रणित श्री मल्लिकार्जुन ग्रामविकास पॅनेल यांच्यात पार पडली.भाजप प्रणित पांडुरंग ग्रामविकास शेतकरी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व चेअरमन चिदानंद चौगुले,शिवकर्ण बिरादार,चन्नाप्पा इराप्पा बिरादार ,इराणगौडा पाटील,व्हा.चेअरमन बाळगोंडा चिंतामणी,अशोक बिरादार गुरूबसू मल्लप्पा बिरादार ,बसनिंगा चिंतामणी ,गुरूबसू इराप्पा बिरादार ,अशोक नाईक,सदाशिव वारद,गुरूबसू हांडगी,काडाप्पा इराप्पा बिरादार ,प्रकाश हल्याळ,गौडाप्पा हल्याळ,अशोक शिवगोंडा पाटील,शिवाप्पा जत्ती ,अण्णासाहेब रुद्रगौडा पाटील,काडाप्पा वारद,सुरेश बाबांण्णा बिरादार ,विठ्ठल चिंतामणी,मारुती बामणे,आप्पासो बामणे,तुकाराम बामणे , सिदगोंडा खलाटी,शंकर चौगुले,श्रीकांत हंडगी तर काँग्रेस प्रणित पॅनलचे नेतृत्व डॉ.रायगोंडा बिरादार,निंगोंडा बिरादार,निंगोंडा गुरुबसू बिरादार, सुरेश बिरादार,भीमण्णा हलकट्टी,भीमण्णा आजुर,भिमाण्णा बेवनूर,प्रकाश म्हेत्रे यांनी केले तर या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस प्रणित पॅनेलचा दारूण पराभव करत भाजप प्रणित पॅनेलने सरपंच उमेदवार व सात सदस्य जिंकून ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता स्थापन केले.सुरुवातीला ही निवडणूक सत्ताधाऱ्यांना सोपी वाटली पण विरोधकांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उडाला.काँग्रेसला फक्त दोनच जागेवर समाधान मानावे लागले.भाजपचे विजयी उमेदवार सरपंच शिवलीला सुरेश पाटील,सदस्य रवींद्र खलाटी,संगाप्पा बिरादार,महादेवी चिंतामणी,चनगोंडा बिरादार,दानेश्वरी चौगुले,उषा व्हनखंडे,संगीता नाईक यांनी विजय मिळवून सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा सुपडासाफ केला.
निवडणुकीचा निकाल लागतात भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळून करीत फटाक्याची आतिश बाजी करण्यात आली व विजयी उमेदवारांचे गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना चेअरमन चिदानंद चौगुले म्हणाले की‌ या निवडणुकीमध्ये मतदारांनी सरपंच उमेदवार व सात सदस्यांना निवडून देऊन आमच्यावर जो मतदान रुपी विश्वास दाखविला त्याला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही व येत्या पाच वर्षात गावचा कायापालट करु असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!