चाळीसगाव येथील पत्रकाराला धमकी देणाऱ्या उपसरपंचासह एकावरती पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(धनश्री फरांदे)जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा आयडियल जर्नलिस्ट लिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना )महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव सूर्यकांत कदम यांच्यावर दिनांक 15/12/2022 रोजी दुपारी 1_15 वाजेच्या सुमारास चाळीसगाव पंचायत समितीच्या गेट समोर हल्ला करून शरीरासाठी करून जीवे मारण्याची धमकी देत आमक्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केल्यास खंडणीचा व इतर कोणताही गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली आहे या प्रकरणी पत्रकार कदम यांनी रवींद्र मोरे व सिद्धार्थ मोरे या दोघांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अदखल पात्र गुन्हा दाखल केला असून दोघांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.तशा आशयाचे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान,केंद्रीय, गृहमंत्री मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहमंत्री पोलीस, महासंचालक, यांच्यासह पोलिस अधिकारी पत्रकार बांधव यांना दिले आहे.15 डिसेंबर रोजी सूर्यकांत कदम यांनी चाळीसगाव येथे येऊन रवींद्र
दिलीप मोरे राहणार पिंपरखेड तालुका चाळीसगाव याने त्यांच्या अंगावर येऊन माझ्याकडे ताठ का बघतो म्हणून माझ्याशी खेटू नको असे म्हणूनहुज्जत करून तू आमच्या विरोधात बातमी छापतो का तुझे हात पाय तोडून तुला मारून टाकेन असं म्हटलं तेव्हा त्याचा भाऊ ग्रामपंचायत उपसरपंच सिद्धार्थ मोरे याने अंगावर धावून येत तुला जिवंत सोडणार नाही तू पत्रकार असला तरी आम्ही पत्रकारांना घाबरत नाही तुला ज्या बातम्या छापायच्या आहेत त्या छाप असे म्हणून झटापटी करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व तू आमच्या विरोधात पोलीस स्टेशन ला तक्रार दिली तर आम्ही ग्रामपंचायतचे पदाधिकारी आहोत आम्ही ग्रामपंचायतची कामे घेऊन ठेकेदारी करतो त्या कामाबद्दल तू आमच्याकडे पैसे मागतो असा खोटा खंडणीचा व दुसरा काही पण खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली एका ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला करणारा रवींद्र मोरे व सिद्धार्थ मोरे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा व क्रिमिनल लॉ अमेंटमेंट 1932 चे कलम 7 (1)(a) नुसार गुन्हा दाखल करावी अशी मागणी आयडियल जनरलिस्ट असोसिएशन नवचैतन्य टाईम्सच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती धनश्री फरांदे आणि आधी पदाधिकारी पत्रकार बांधवांनी दिली आहे.

error: Content is protected !!