“”लोकसहभागातूनच सर्वांगीण आणि परिपूर्ण विकास”…

नवचैतन्य टाईम्स वाई(अमोल मांढरे)लोकसहभाग हा शब्द सामान्य नाही.
त्यात एक मतीत अर्थ लपला आहे. आपल्या समाजातील एखाद्या लोकहिताच्या कार्यात लहान मोठ्या क्षेत्रामधील आणि प्रत्येक जातीपातीतील लोकांचा सहभाग आवश्यकच आहे. एखादे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी विभिन्न लोकांच्या अभ्यासपूर्ण आणि सुनियोजित आलेखाचा महत्त्वाचा सहभाग आहे.आजच्या जागतिकीकरणात एखादी विकासाचे काम लोकसभागातूनच शक्य आहे. आपण पुरातन काळापासून अगदी आपल्या विश्वाच्या निर्मितीपासून प्रत्येक घटना ही लोकसहभागातूनच निर्माण झालेली आहे. आपण जर अश्व युगातील माणूस बघितला तर तो प्रत्येक संकटाला आणि परिस्थितीला सामोरे जाऊन संघटितपणे सामोरे जाऊन स्वतःचा परिपूर्ण विकास केला. जगाच्या पाठीवरील आदर्श असणाऱ्या आपल्या इतिहासात नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की तेव्हा आपल्यावर परकीयांचे राज्य होते. सामान्य जनतेवर जुलूम आणि अन्याय तीव्र होता. तेव्हा याच आपल्या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाला विरोध करण्याचा दृढ निश्चय केला. तेव्हा त्यांनी प्रथम आपल्या स्वराज्यातील अठरापगड जातीतील शूर आणि लढवय्या मावळ्यांना एकत्र करून त्यांचे प्रबोधन करून स्वराज्याच्या लढ्यात त्यांनाही सामील करून घेतले. आणि नंतरचे प्रत्येक पाऊल संघटितपणे अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध करून परकीय आक्रमणाला संपवून आदर्श स्वराज्य निर्माण केले. आणि नंतर तेच आदर्श स्वराज चालवताना लोक सहभाग हा मुख्य पाया त्यांनी घातला. आणि त्याच
राजनीति चा अभ्यास आज जगातील बलाढ्य देशही करत आहेत. यातूनच लोक सहभागाचे महत्त्व आपल्या युवकांना नक्कीच कळले असेल. त्याचबरोबर आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महापुरुषांनी स्वतः पुढे येऊन राष्ट्रहित हे एक मात्र उद्दिष्ट समोर ठेवले. तेव्हा त्याच स्वातंत्र्यसैनिकांनी प्रथम आपल्या सामान्य नागरिकांमध्ये आपले स्वातंत्र्याचे महत्त्व आणि देश हिताचे विचार पोहोचविले. आणि हीच जनशक्ती उद्याचे देशाचे आपले स्वातंत्र्य देण्यासाठी कारणीभूत ठरले.
त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतरच्या काळातही आपल्या देशावर अनेक संकटे आली. आपले शत्रू राष्ट्रांच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी आपल्या अनेक शूर जवानांनी शौर्य गाजविले.
आणि त्याच या युद्धकाळात आपल्या सामान्य जनतेनेही आपले शासनाची व जवानांचे मनोधैर्य वाढविले. आज वाढत्या शहरीकरणात प्रत्येक क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे. पूर्वी काही अंतर चालणारा माणूस आज मंगळावर वास्तव्य करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. कारण हा सर्व बदल फक्त लोकसहभागातून शक्य झाला आहे. संघटितपणे येणाऱ्या समस्यांना सामना करून त्यावर रोख उत्तर देण्याचे ठरविले होते. आज जगातील बलाढ्य देशही त्यांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग आवर्जून घेण्यासाठी दक्ष राहतात कारण तेच कार्य पुढे भविष्यातही चिरंतर आणि अबाधित राहते. तेव्हा आपले शासनाचे एक आद्य कर्तव्य म्हणजे देशाच्या विकासाच्या निर्णय प्रक्रियेत विशेषतः युवक वर्ग व विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन पूर्णत्वास न्यावे. कारण याच कारणामुळे तो निर्णय हा अचूक राहील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. त्याचबरोबर परराष्ट्र धोरणाच्या निर्णय प्रक्रियेत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन वैचारिक व पक्ष मतभेद बाजूला ठेवून, राष्ट्रहिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा तेव्हा आजही आपले लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विकास कार्यात तळागाळातल्या आणि सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करून, त्याचा आलेख आखावा. आणि आपण नागरिकांनी ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शासनाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत स्वतः पुढे येऊन सकारात्मक सहभाग घ्यावा. व एखाद्या निर्णयाच्या चर्चेत आंदोलन हा एकमेव पर्याय नसून शांततेने व अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन समाजात शांततेचे वातावरण ठेवावे. जगाच्या पाठीवरील आपली आदर्श भारतीय संस्कृती ही सर्वांना हेवा वाटणारीच आहे. तेव्हा आज आपल्या समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्रितपणे राहून राष्ट्रहितासाठी कार्य करावे. आपल्या देशाचा आदर्श इतिहास, योगाभ्यास, आयुर्वेद, स्वदेशी चे महत्व, आदर्श शिक्षण संस्था, कला_संस्कृती, यांचे पावित्र्य आपण सर्वांनीच लोकसहभागातूनच अबाधित राखावे. आणि त्यामुळेच आपला देश लोकसहभागामुळेच जगाच्या पाठीवर एक महाशक्ती म्हणून नक्कीच उदयास येईल. तेव्हा लोक सहभाग हा आपल्या समाजासाठी व पर्यायाने देशासाठी तितकाच सकारात्मक विषय आहे. आणि लोक सहभागामुळेच सर्वांगीण आणि परिपूर्ण विकास आहे.. धन्यवाद.
भारत माता की जय.
भारत माता की जय.
जय हिंद. जय भारत. जय महाराष्ट्र..
कविराज अमोल मांढरे.वाई. जिल्हा सातारा..
मोबाईल नंबर.७७०९२४६७४०.

error: Content is protected !!