ज्ञानदीप स्कूल वाई मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन कार्यक्रम अभुतपूर्व उत्साहात संपन्न

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(प्रा.संभाजी लावंड)-वाई येथील ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विद्यालयातील १४ वर्षाखालील पंधरा मुलींनी नायगांव-खंडाळा ते ज्ञानदीप स्कूल वाई अशी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची, ज्ञानाची, क्रांतीची ज्ञानज्योत-मशाल घेऊन साधारणपणे पंच्चेचाळी ते पन्नास किलोमीटर धावत आणली.
पहाटे ज्ञानदीप को- ऑप क्रेडिट सोसायटी चे संस्थापक- अध्यक्ष मा. विश्वनाथ पवार, विद्यार्थिनी संस्थेचे उपाध्यक्ष मा. चंद्रकांत ढमाळ, यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले नायगांवच्या सरपंच सौ साधना नेवसे,ज्ञानदीप चे संचालक मा. अनुप पवार,शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार मॅडम, इव्हेंट इन्चार्ज मा.सचिन लेंभे,मा.तुषार देवढे यांच्या हस्ते पूजन करुन ज्ञानज्योत मशाल विद्यार्थीनी कडे सुपुर्द करण्यात आली.यावेळी नायगांव ग्रामस्थ बंधू-भगिंनी उपस्थित होते.
शैक्षणिक क्रांतीज्योत- मशाल मुलींनी धावत आणण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याने ज्ञानदीप ने एक नवा विक्रम केला.ही संकल्पना क्रिडा शिक्षक मा.सचिन लेंभे यांच्या संकल्पनेतून साकार झाली
यावेळी शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी वाई तालुका गटशिक्षणाधिकारी मा.सुधीर महामुनी साहेब,नायब तहसीलदार सौ.वैशाली घोरपडे मॅडम, विद्यावर्धिनी संस्थेचे सचिव -मा.राहुल जगदाळे,विश्वस्त -मा.दिलीप चव्हाण,प्रा.मा.डी.डी.वाघचवरे,मा.दत्ता मर्ढेकर,प्राचार्या शुभांगी पवार मॅडम,सौ.कल्पना जगताप मॅडम,आदी मान्यवर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक, विद्यार्थी उपस्थित होते
यावेळी मनोगत व्यक्त करताना गटशिक्षणाधिकारी मा. सुधीर महामुनी म्हणाले ज्ञानदीप विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणारी उपक्रमशिल शाळा आहे.
सावित्रीबाई फुले ज्ञानज्योत धावत आणत एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्या बद्दल शाळेचे व विद्यार्थीनी चे अभिनंदन केले.सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या कार्याची सुरुवात थट्टा.. विरोध.. व नंतर त्यांच्या विचा रांचा स्विकार झाला.व पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देवून खरा अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव बहुमान झाला. सावित्रीबाई फुले यां च्या कार्यामुळेच मुली मोफत शिक्षण घेवून समाजव्यवस्था सुधारणेचे अखंड कार्य सुरू आहे.. यावेळी नायब तहसील दार सौ वैशाली घोरपडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि शाळेची उन्नती पाहुन समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ज्ञानज्योत धावत आणणाऱ्या मुली कु. रूतुजा सावकार, कु. मनस्वी दुधे, कु.वंशीका दुधे,कु.आदिती जगताप, कु.अनुष्का महांगडे, कु. सौख्यदा लेंभे, कु.मनस्वी जाधव,कु.आदिती निंबाळकर, कु.गायत्री गलांडे, कु. तनिष्का चव्हाण, कु.जान्हवी डेरे, कु. प्रणाली बोंडरे कु.अहिल्या खरात कु. समिक्षा राऊत,कु.गौरी बाबर यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.संस्थेचे विश्वस्त प्रा.डी.डी.वाघचवरे यांनी शाळा करत असलेल्या विविध उपक्र मांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.संभाजी लावंड,सौ.आशा पवार मॅडम यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार मॅडम यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.संजय डेरे सर,मा. प्रमोद लोंढे सर,मा. अमर धापते सर,मा.इम्रान मुजावर,सौ.गितांजली शिवर कर,सौ कार्तिकी डेरे,सौ.निशा बाबर,सौ.क्रांती भागवत,सौ.तेजस्वी जमदाडे, सौ.पल्लवी काळे,सचिन मालु सरे,विसरेन जाधव,दत्ता महां गडे,स्वप्नील शिंदे,सौ.मिना मर्ढेकर,आदिंनी सहकार्य केले.

error: Content is protected !!