पत्रकारांकडून समाज परिवर्तनाचे मोठे काम-साधना बहेनजी

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-समाजातील उणीवावर बोट ठेऊन वृतपत्राच्या माध्यमातून पत्रकार समाज परिवर्तनाचे मोठे काम करीत असल्याचे प्रतिपादन कवठेमहांकाळ येथील प्रजापती ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख साधना बहेनजी यांनी केले.त्या पत्रकार दिनानिमित्त विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सन्मान कार्यक्रमात बोलत होत्या.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजाराम पाटील होते.
यावेळी बोलताना साधना बहेनजी पुढे म्हणाले की वृतपत्रात येत असणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीतील शोधबोध घेऊन चांगल्या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगून स्वतःपासूनच समाज परिवर्तनाचे काम केले पाहिजे अश्याही त्या यावेळी म्हणाल्या.
तर अध्यक्ष स्थानावरुन बोलताना प्रा राजाराम पाटील म्हणाले की पत्रकारिता ही एक सामाजिक बांधिलकी आहे ती बांधीलकी जोपासतच पत्रकार अहोरात्र आपले काम करीत असतो.वृतपत्रातील विविध विषयांवरील लेखन सर्वांनीच वाचले पाहिजे यातुनच मोठे समाज प्रबोधनही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने साधना बहेनजी यांच्या हस्ते उपस्थित पत्रकार राजाराम पाटील,एच बी तांबोळी,जालिंदर शिंदे,लक्ष्मण सणगर,तानाजी शिंगाडे,चंद्रकांत जगताप,वैभव केंगार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी मालन सोळसे,शालन साळुंखे,संगीता परदेशी,जया माळी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत उमाकांत परदेशी यांनी तर आभार अरुण कोठावळे यांनी मानले.सुत्रसंचालन मालन सोळसे यांनी केले.

error: Content is protected !!