ग्राहकांना आपल्या हक्काची जाणिव व्हावी यासाठीच ग्राहक दिन-मा.सौ सुरेखाताई शिंदे
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणिव व्हावी,बाजारपेठेत खरेदीच्या हक्कां बाबत तो सक्षम व्हावा त्याचबरोबर विक्रेता व ग्राहक यांच्यामध्ये सुसंवाद राहावा यासाठीच ग्राहक दिन साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन एमपी गॅस एजन्सीच्या संचालिका सौ सुरेखाताई शिंदे यांनी केले.त्या घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे घेण्यात आलेल्या ग्राहकांच्या मेळाव्यात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पत्रकार मिलिंद पोळ होते.
यावेळी सौ सुरेखाताई शिंदे पुढे म्हणाल्या की ग्राहक हक्क संरक्षणासाठी तात्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेऊन ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करुन घेतले होते.त्यामुळेच आज देशभरात तो एक मोठा कायदा निर्माण झाला आहे असेही त्या म्हणाल्या.तर वाजवी किंमत व शुध्दता या ग्राहकांच्या मुख्य गरजा आहेत व ग्राहकांना त्यांच्या हाक्काची जाणिव व्हावी हा एकमेव उदेश् ग्राहक दिनामुळे साध्य होत असल्याचे मिलिंद पोळ यांनी यावेळी सांगितले.मधुकर शिंदे अविष्कार शिंदे,सौ सुरेखा शिंदे,स्नेहल शिंदे,राजेश कुंभार संतोष चौधरी,स्वप्नील झांबरे,ऋषीकेश पाटील,सचिन चव्हाणसह ग्राहक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.स्वागत मधुकर शिंदे यांनी तर आभार ऋषीकेश शिंदे यांनी मानले तर सुत्रसंचालन स्नेहल शिंदे यांनी केले.