कोरोना काळात औषध विक्रेते बनले देवदूत-मा.हभप तुकाराम बाबा
नवचैतन्य टाईम्स जत(प्रतिनिधी):-२०१९ व २०२० मध्ये जीवघेणा कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला. दवाखान्यात दाखल झालेला रुग्ण परत येईल याची शाश्वती नव्हती.लॉक डाउनच्या काळात औषधे विक्रेत्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत रुग्णाची सेवा केली.कोरोना काळात औषध विक्रेते देवदूत बनले व अनेकांचे प्राण वाचवले हे विसरून चालणार नसल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती,श्री संत बाबडेबाब मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
जत येथे सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील आठही तालुक्याने सहभाग नोंदविला होता. यंदाचा चषक खानापूरने पटकाविला तर जत संघाला उपविजेतेपद मिळाले. वाळव्याचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेतील महाविजेते, उपविजेत्या संघाला चषक, मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत तिसऱ्या आलेल्या संघाला तसेच मॅन ऑफ मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांनाही सन्मानित करण्यात आले.हभप तुकाराम बाबा महाराज ,महाराष्ट्र स्टेट फार्मसी कॉन्शील अधक्ष्य विजय पाटील, सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष भरत सावंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.,अनिल देशमुखे,श्रीकांत गायकवाड,दीपक मगदूम ,सचिन शकळे, स्पोर्ट्स को.चेअरमन प्रकाश मगदूम,सागर साठे,माजी जिल्हाध्यक्ष सुरेश संख,सुरेश पट्टनशेट्टी, तालुका अध्यक्ष भगवान पवार, संचालक सुनील घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुष्काळी तालुका असलेल्या खानापूर जतसह ज्या वाळवा तालुक्यातून दुष्काळी लढयाचे रणशिंग फुंकले गेले या तिन्ही तालुक्याने हे बक्षीस पटकावल्याचा आवर्जून उल्लेख करून तुकाराम बाबा महाराज म्हणाले,दुष्काळी तालुक्यात गुणवत्ता ढासून भरली आहे याचे हे उदाहरण आहे.आजच्या या युगात मैदानी स्पर्धा होणे काळाची गरज आहे.सामाजिक संस्था व शाळेंनी मैदानी स्पर्धेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.