श्री क्षेत्र हरणेश्वर जवळील पोल्ट्रीचे बांधकाम तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन-पांडुरंग कोळेकर

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- रायवाडी (ता कवठेमहांकाळ) गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या अगदी प्राचीन व धार्मिक स्थळ असणाऱ्या श्री क्षेत्र हरणेश्वर मंदिरापासून काही अंतरावर उभी रहात असलेल्या पोल्ट्रीचे बांधकाम तात्काळ बंद करा अन्यथा नाविलाजास्त्व त्याविरोधात तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा सज्जड इशारा रायवाडीचे माजी उपसरपंच पांडुरंग कोळेकर यांनी दिला आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना कोळेकर म्हणाले की रायवाडी (ता कवठेमहांकाळ) गावाजवळ अगदी प्राचीन व धार्मिक असे श्री हरणेश्वर मंदिर आहे.की ज्याचा शिवलीलामृत ग्रंथाच्या १६ व्या अध्यायात उल्लेख आहे.नेहमी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात ये- जा सुरू असते.श्रावण महिन्यात तर येथे मोठी यात्रा व गर्दी असते.याच श्री क्षेत्र हरणेश्वर मंदिरा पासून काही अंतरावर दोनतीन एकरामध्ये मोठ- मोठ्या पोल्ट्रीच्या शेडचे बांधकाम सुरू आहे.ते गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.तेव्हा ते बांधकाम तात्काळ बंद करावे असे आवाहन कोळेकर यांनी केले आहे.
जर ही प्रोल्टी पुढे सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य व कुत्र्यांचा सुळसुळाट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या घाणीमुळे भाविकांच्या व गावकऱ्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.त्याचबरोबर सदर बांधकामा जवळच जनावरे चारण्यासाठीचे क्षेत्र आहे.त्यामुळे त्याच फटका जनावरांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.जरी हे क्षेत्र नागज हद्दीत असले तरी ते रायवाडी गावापासून अगदी जवळ आहे.त्याचा रायवाडी गावाला फटका बसणार आहे.तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून सदर पोल्ट्रीचे बांधकाम तात्काळ बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशाराही कोळेकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!