कृषी विभागातुन ब्लोअर खरेदीसाठी अनुदान मिळवुन देण्याच्या बहाण्याने शेटफळे येथील शेतकऱ्यांना लाखो रुपयास गंडा आरोपीस आटपाडी पोलीसानी केले जेरबंद

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)कृषी विभागातुन ब्लोअर खरेदीसाठी शासनाकडुन आनुदान मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन संशयीत आरोपी भागेश रामजी नांदवडेकर वय वर्षे ३२ रा.राजीव गांधीनगर सांळुखे गल्ली नवीन म्हसोबा मंदिर कळंबा कोल्हापूर मुळ राहणार गडहिंग्लज या इसमाने बोअरस्ते कंपनीचा डिलर आहे असे भासवुन कृषी विभागास अनुदाना साठी बिले देतो असे सांगुन शेटफळे येथील शेतकरी सोमनाथ नानासो मोरे वय ३५ रा.शेटफळे यांच्याकडुन २ लाख ८० हजार घेवुन सदर शेतकऱ्यांला अनुदान मिळवुन न दिल्याने व कृषी विभागाकडुन मिळणारे अनुदानाची रक्कम १लाख २५ हजार न आल्याने सदर शेतकऱ्यांची एकुन रक्कम रुपये ४ लाख पाच हजार रुपयाची फसवणुक केली आहे.सदर बाबत फिर्यादी सोमनाथ मोरे यांनी १३/१२/२०२२ रोजी आटपाडी पोलिसांनी गुन्हा रजि.नं ४०५/२०२२ भा.द.वि.स.कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हाचा तपास पोलिस हेड कॉस्टेबल महेश आवळे हे करीत आहे.सदर आरोपीला१५जानेवारी रोजी अटक केली असुन १९ तारखेपर्यत पोलिस कस्टडी मिळाली आहे.सदर गुन्हाच्या तपासामध्ये सदरचा गुन्हा आरोपी उमेश उर्फ तुकाराम प्रकाश लिंगडे रा.माडगुळे ता.आटपाडी यांच्या मदतीने केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदर आरोपीस दिंनाक १९जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे.आरोपी भागेश नांदवडेकर व दुसरा आरोपी उमेश उर्फ तुकाराम प्रकाश लिंगडे यांना मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो यांनी सदर आरोपीना २३ जानेवारी पर्यत पोलिस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे.सदर आरोपी भागेश नांदवडेकर व दुसरा आरोपी उमेश उर्फ तुकाराम प्रकाश लिंगडे या दोघांनी बोअरस्ते कंपनीचे बनावट सिरीयल नंबर प्लेट तयार करुन ती नंबर प्लेट जुन्या ब्लोअरला वापरुन शासना कडील अनुदान घेवुन शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे.सदरची कामगिरी मा.पोलिस अधिक्षक डॉ बसवराज तेली सो यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.पोलीस निरीक्षक शरद मेमाणे सो पो.हे कॉ/८६० महेश आवळे, पो.हे.कॉ/९१५ विकास जाधव,पो.हे.कॉ/१८६० दादा ठोंबरे, पो.हे.कॉ/२४४४ विजय नरळे यांनी केली आहे.

error: Content is protected !!