घाटनांद्रेत मेंढपाळास वनविभागाकडून नुकसान भरपाई

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/ वार्ताहर(जालिंदर शिंदे):-घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे लांडग्यांच्या हल्यात बळी पडलेल्या मेंढ्याच्या मालकास वन विभागाकडून मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत माहिती अशी की गेल्या आक्टोबर(०७/१०/२०२२) महीन्यात मेंढपाळ लक्ष्मण मुत्ताप्पा कोरे (जनवाड ता चिक्कोडी जि बेळगांव) यांची मेंढरे सध्याचे विद्यमान सरपंच अमर विठ्ठल शिंदे यांच्या शेतात मुक्कामास होती.या दिवशी मध्यरात्री लांडग्यानी केलेल्या हल्ल्यात ९ लहान कोकरे मयत झाली होती.सदर घटना अमर शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी वनविभागास कळवून पंचनामा करण्यास भाग पाडले होते.
त्यानुसार वनविभागा कडून वनपरिक्षेत्र अधिकारी सांगलीचे युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळचे वनपाल आर आर नाईक,वनरक्षक डी एस बजबळकर,वनमजूर नागेंद्र रुपनर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व पुढे भरपाईसाठी प्रस्तावही पाठविला होता.त्यानुसार मंगळवारी सदर नुकसानग्रस्त मेंढपाळास ग्रामपंचायत कार्यालयात बोलवून वनविभागा मार्फत ३२८५०/- रुपयेचा धनादेश देण्यात आला.यावेळी वनपाल आर आर नाईक,वनरक्षक डी एस बजबळकर,वनमजूर नागेंद्र रुपनर,सरपंच अमर शिंदे,उपसरपंच सुनील कांबळे,सदस्य अभिजित शिंदे, सागर शिंदे,ग्रामसेवक झैलसिंग पावरा,कृषी सहाय्यक कोलगणे,तलाठी वैभव पाटील दिलीप शिंदे,संतोष शिंदेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!