घाटनांद्रेत बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत तसेच शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे व थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच अमर शिंदे,उपसरपंच सुनील कांबळे,ग्रामसेवक झैलसिंग पावरा,सदस्य सर्वश्री अभिजित शिंदे,सागर शिंदे,कुलदीप शिंदे,सदाशिव गुरव,दादासो शिंदे, अमित शिंदे,बाळू आठवलेसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
तर शिवसेनेच्या वतीने दिनकर (तात्या) पाटील,तालुका प्रमुख मारुती पवार,अनिल बाबर,धनंजय देसाई,बाळासाहेब शिंदे,सचिन शिंदे,सुरेश शिंदे,रमेश शिंदेसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बोलताना दिनकर( तात्या) पाटील म्हणाले की स्व बाळासाहेब ठाकरे हे केवळ व्यक्तीच नव्हे तर ती एक महाशक्ती होते.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे हिंदुत्व आणि राष्ट्रीय विचारांसाठी पणाला लावल्याचे सांगितले.तर बाळासाहेब या नावाचा दरारा व रुबाब अगदी शेवट पर्यंत ठिकूण होता व आज त्यांच्या पश्चात ठिकूण असल्याचे प्रतिपादन तालुका प्रमुख मारुती पवार यांनी यांनी यावेळी सांगितले.