पसरणी गावात प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात संपन्न

नवचैतन्य टाईम्स वाई तालुका प्रतिनिधी(धनश्री फरांदे )वाई तालुक्यातील पसरणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वतीने मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले नंतर पसरणी गावातील महिला सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत ध्वजगीत प्रतिज्ञा समूहगीते विद्यार्थिनींनी अतिशय सुमधुर स्वरात सादर केले. तसेच काही लेझीम नृत्य व कवायत सादर करण्यात आल्या. व आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी एक नाट्य सादर करण्यात आले.त्यानंतर पसरणी ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण करण्यासाठी सर्व नागरिक तसेच शिक्षक वर्ग व सर्व विद्यार्थी ग्रामपंचायत च्या परिसरामध्ये हजर झाले व तेथील ध्वजारोहण करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत पसरणी येथील ग्रामस्थ व प्राथमिक माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच आशाताई बचत गटाच्या महिला आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच गावातील शिक्षण प्रेमी पालक व ग्रामस्थ आजी माजी विद्यार्थी विविध मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!