व्हॉइस ऑफ मिडिया संलग्न जत तालुका मराठी पत्रकार संघ तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी राजू माळी डिजिटल मिडिया तालुका अध्यक्षपदी नजीरभाई चट्टरकी तर जिल्हा सदस्यपदी दत्ता सावंत यांची अभिनंदनीय निवड
नवचैतन्य टाईम्स जत/प्रतिनिधी:- राज्यस्तरावरील व्हॉइस ऑफ मिडिया या संघटनेशी संलग्न असणाऱ्या जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी दै. संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी यांची एकमताने निवड करण्यात आली तर डिजिटल व सोशल मिडियाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, टीव्ही न्युजचे मराठी वाहिनीचे संपादक नजीरभाई चट्टरकी व तसेच जिल्हा कार्यकरणीवर दै. सकाळचे माडग्याळ प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार दत्ता सावंत यांची निवड करण्यात आली.
मागील तीन वर्षपासून जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र काम करीत आहेत. विविध सामाजिक उपक्रमासह पत्रकारांच्या विविध अडचणी सोडवून त्यांना मदत करण्याचे काम केले जात आहे. यंदा प्रथमच संघटनेची राज्यस्तरावरील व्हॉइस ऑफ मिडिया या संघटनेशी संलग्न करण्याचा पत्रकार श्री.मारुती मदने यांनी निर्णय घेतला त्यानुसार जत येथे मंगळवारी माववळते अध्यक्ष मनोहर पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यात नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
कार्यकारणी अशी तालुका अध्यक्ष: राजू माळी, कार्याध्यक्ष मच्छिंद्र बाबर, उपाध्यक्ष: हणमंत शिंदे (सोन्याळ) संजय कोटगोंड (बिळूर), हणमंत बाबर (आवंढी). सचिव: विकी वाघमारे (माडग्याळ). खजिनदार: संतोष पोरे (येळवी). सहसचिव: प्रमोद क्षीरसागर (जत). तालुका संघटक:सुभाष कोकळे (उमदी). प्रसिध्दी प्रमुख: प्रदीप कुलकर्णी.
डिजिटल मीडियाच्या अध्यक्षपदी नजीरभाई चट्टरकी तर सचिवपदी माडग्याळ येथील आंबाणा माळी यांच्या एकमताने निवडी करण्यात आल्या.
संघाचे माजी अध्यक्ष मारुती मदने म्हणाले, जत तालुका मराठी पत्रकार संघ गेल्या तीन वर्षांपासून चांगले काम करीत आहे. तालुक्यातील अडचणीत असणाऱ्या प्रत्येकाला मदत करणे व त्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी संघाने घेतली आहे. तालुका पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना अधिकचा न्याय मिळावा यासाठी राज्य पातळीवरील संघटनेशी एकरूप होणे गरजेचे आहे. राज्य पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळावा यासाठी हा संघ आता राज्यस्तरावरील व्हॉइस ऑफ मिडिया या संस्थेशी संलग्न राहून काम करणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार मनोहर पवार म्हणाले, सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवला तर न्याय नक्कीच मिळतो. आजपर्यंत काम करीत पत्रकारांचे हित लक्षात घेवून कामकाज केले. यापुढेही हा संघ असेच काम करीत राहील.
यावेळी सदाशिव माळी,वसंत सावंत, के अजितकुमार, बाबासाहेब कांबळे, सुनिल घाटगे, प्रकाश करणीकर, नागेश ऐवळे, लिंगराज बिरादार, नारायण भोसले, वसंत सांवत, हणमंत कोळी, केराप्पा हुवाळे, नारायण भोसले, कल्लण्णा बालगाव, रमेश चौगुले, महेश हडपद, रोहित माने, कल्लाप्पा कोळी,महावीर मड्डीमनी, रफिक पटेल, नागेश सोनूर, सचिन चव्हाण, हणमंत कोळी आदी उपस्थितीत होते.
■ जतच्या पत्रकारितेला बळकटी देणार- माळी व चट्टरकी
जत तालुक्यातील पत्रकार बांधवांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ ठरवित जतच्या पत्रकारितेला बळकटी देण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष राजू माळी, नजीरभाई चट्टरकी यांनी व्यक्त केली.
■ जत तालुक्यातील सर्व पत्रकारांचा दहा लाखाचा आरोग्य विमा काढणार- दत्ता सावंत
जत तालुक्यातील सर्व पत्रकारांचा दहा लाखाचा आरोग्य विमा व्हॉइस ऑफ मिडियाच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. तेव्हा पत्रकार बांधवांनी आमच्याकडे आधार कार्ड झेरॉक्स आणून द्यावेत असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा सदस्य दत्ता सावंत यांनी यावेळी बोलताना केले.