कवठेमहांकाळच्या कृषी सहाय्यीका व्ही जी सुदेवाड यांचा गौरव

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-२०२३ अंतर्गत खरीप हंगामात उत्कृष्टपणे केलेल्या कामाची त्याचबरोबर अगदी चांगल्या प्रकारे पीक प्रात्यक्षिके राबवल्या बाबतची दखल घेऊन कृषी विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जत येथे मोरगाव-कवठेमहंकाळच्या कृषी सहाय्यीका श्रीम व्ही जी सुदेवाड यांचा जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आला.यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कृषी विभागाने केलेल्या कामा बद्दल समाधान व्यक्त करुन,उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी,कर्मचारी व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेणाऱ्या शेतकर्यांचा तसेच वेगवेगळ्या तृणधान्याचा वापर करून रांगोळी काढलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गोरव करण्यात आला.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ,श्रीम दिपाली जाधव,मेडीदार साहेब,कवठेमहांकाळ तालुका कृषी अधिकारी एम जे तोडकर,जतचे माजी सभापती बाबासाहेब कोडगसह शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सुत्रसंचालन लहू कांबळे यांनी तर आभार मेडीदार यांनी मानले.

error: Content is protected !!