किसन वीर महाविद्यालय वाई येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम संपन्न

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे)वाई.28.जानेवारी किसन वीर महाविद्यालय वाई. येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक व कवी अमोल मांढरे यांना निमंत्रित केले होते. या वेळेला किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फगरे. सर यांच्या हस्ते अमोल मांढरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यिक अमोल मांढरे यांनी मराठी भाषेचे संवर्धन किती महत्त्वाचे आहे. आणि करिअर नंतर जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी, आपल्या माय मराठी मातृभाषेची पावित्र्य आणि आदर्श कायम ठेवावे. हे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची आणि महापुरुषांची पार्श्वभूमी आहे. त्यांनी दिलेली आदर्श विचार हे आपल्या मराठी मातृभाषेतूनच आहेत. आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा ही मराठी माणसांसाठी संकटांची लढण्यासाठी एक संजीवनीच आहे. हे विद्यार्थ्यांसमोर सांगितले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी कॉलेज कट्टा ही विनोदातून गांभीरेकडे जाणारी कविता सादर केली.नंतर अमोल मांढरे यांचा प्राचार्य डॉ. फगरे. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमोल मांढरे हे किसनवीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. व किसन वीर महाविद्यालयातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. तेव्हा श्री अमोल मांढरे यांनी त्यांच्या जडणघडणीत आपल्या महाविद्यालयाचा बहुमोल वाटा आहे आणि किसन वीर महाविद्यालयाचे आभार मानले. धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे.वाई. जिल्हा सातारा.Mobile no.7709246740.

error: Content is protected !!