हरोली येथील महीला मेळाव्यास मोठा प्रतिसाद
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामपंचायत हरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेत झालेल्या महीला मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी वैशाली पाटील यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच रेश्मा पाटील यांनी या महिला मेळाव्या विषयीची संकल्पना विषद केली.कृषी सहाय्यीका श्रीम सुनिता पाटील यांनी यावेळी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग निर्मिती योजने बाबतची उपस्थित महिलांना माहीती दिली.
तदनंतर सावित्री महिला सेवाभावी संस्थेच्या सौ अस्मिता सगरे यांनी यावेळी लघु गृह उद्योग व उद्योग क्षेत्रासाठी शेती पुरक असणाऱ्या व्यवसायाचे म्हत्व सांगितले.त्यानंतर साहित्यिक आण्णाप्पा शिंदे यांनी ‘माहेरची वाट’ ही कथानक सांगुन उपस्थितांना वास्तविक व भावनिक बनवले.
माजी सभापती सौ सुरेखा कोळेकर यानी यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी रूडी परंपराना छेद देत महिलांनी व्यवसायात स्वताचे असे करीअर करण्याचे आवाहन केले.यावेळी हळदीकुंकू व तीळगूळ वाटपाचाही कार्यक्रम पार पडला.
सरपंच रेश्मा पाटील,माजी सभापती सुरेखाताई कोळेकर,कृषीसहाय्यीका सुनिता पाटील,ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री संगीता हुलवान,रूक्मिणी सुर्वे,मयुरी पाटील,अंजना पाटील,उज्वला पाटील,अलमास मणेर,प्रतिभा पवार,दिवाण मॅडम,अर्चना माने,सोनाली शिंदे,सुरेखा बंडगर,चंद्रकांत पाटील,दत्तात्रय पाटीलसह महिला शेतकरी उपस्थित होते.अभार सुरेखा कोळेकर यांनी मानले.