तिसंगी येथील कृषी सहाय्यीका एस एस शेळके यांची जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते सन्मान
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य सन-२०२३ अंतर्गत खरीप व रब्बी हंगामात अगदी उत्कृष्टपणे शेती शाळा घेऊन महिलांना शेती शाळेच्या माध्यमातून ज्ञान देऊन व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातंर्गत माहिती देऊन महिलांना स्वताच्या पायावर उभे करण्यास परावृत्त केल्याच्या त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजना अगदी उत्कृष्टपणे राबविल्याच्या कामाची दखल घेऊन कृषी विभागाच्या वतीने जत येथे घेण्यात आलेल्या एका छानदार कार्यक्रम तिसंगी (ता कवठेमहांकाळ) च्या कृषी सहाय्यीका एस एस शेळके यांचा जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कृषी विभागाने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेणाऱ्या शेतकर्यांचा तसेच वेगवेगळ्या तृणधान्याचा वापर करून रांगोळी काढलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्य वराच्या हस्ते यथोचित गौरव व सन्मान करण्यात आला.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ,उपविभागीय कृषी कार्यालयाच्या तंत्र अधिकारी दिपाली जाधव,जतचे तालुका कृषी अधिकारी मेडीदार,कवठेमहांकाळ तालुका कृषी अधिकारी एम जे तोडकर माजी सभापती बाबासाहेब कोडग सह शेतकरी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत दिपाली जाधव यांनी तर आभार मेडीदार साहेब यांनी मानले.यावेळी सुत्रसंचालन लहू कांबळे यांनी केले.