घाटनांद्रेचे सरपंच,सदस्यांचा मीरा-भाईंदर मध्ये सत्कार
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- मीरा-भाईंदरचे माजी नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व प्रेमा लक्ष्मण विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष हरेन लक्ष्मण गावंड याच्यां वतीने घाटनांद्रे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी सहकारचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील,युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपेश गावंड,राज्यराज्यं मनसे सहकार सेनेचे सरचिटणीस विजयराव शिंदे,घाटनांद्रेचे मीरा-भाईंदर स्थीत जगन्नाथ शिंदे,शुभम गावंड, श्रीकांत सुर्वेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घाटनांद्रेचे नवनिर्वाचित सरपंच अमर शिंदे,उपसरपंच सुनील कांबळे,सदस्य अभिजित शिंदे,सागर शिंदेसह युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कुलदीप शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.स्वागत जगन्नाथ शिंदे यांनी तर आभार दीपेश गावंड यांनी मानले.तर सुत्रसंचालन श्रीकांत सुर्वे यांनी केले.