विजयनगर येथे भाजपकडून महिला दिनानिमित्त स्व.सुषमा स्वराज पुरस्कारांचे वितरण सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स सांगली(प्रतिनिधी)घर संसार सांभाळत प्रत्येक स्त्री ही पुढची पिढी घडवण्याचे काम करीत असते. त्यामुळे केवळ महिला दिनीच नव्हे तर वर्षातील 365 दिवस स्त्रीचा सन्मान होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले. आज शुक्रवारी विजयनगर येथील भाजप कार्यालयात विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठविणाच्या महिलांचा स्वर्गीय सुषमा स्वराज आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित महिलांना महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. उषा दशवंत, प्राजक्ता कोरे, वैभवी कुलकर्णी, सुरेखा जगताप,यांनी मार्गदर्शन केले.तर संगीता साळुंखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रारंभी पुरस्कारप्राप्त महिलांनी आपल्या कार्याची ओळख करून दिली.त्यानंतर जिल्ह्यातील 20 महिलांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाचा दिलेला पुरस्कार हा आदर्शवत असाच असून त्यांच्या विचारांचा आम्हला भावी वाटचालीस पदोपदी उपयोग होईल आशा प्रतिक्रिया पुरस्कारप्राप्त महिलांनी दिल्या शेवटी अल्पोहाराने कार्यक्रमाचा सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!