जागतिक महिला दिनानिमीत्य महिला सक्षमीकरण फाउंडेशन च्या वतीने नारी शक्तीचा सन्मान व पुरस्कार सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(दत्तात्रय ढमाळ)-जागतिक महिला दिनानिमीत्य महिला सक्षमीकरण फाउंडेशन तर्फे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान कर्तुत्वाचा या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन वाई तालुक्याचे नायब तहसिलदार मा.सौ गिताजंली गरड हे उपस्थित होते.पुरस्कारामध्ये मा.सौ शितल खराडे (डिवाएसपी वाई)मा.सौ श्वेता खरात(अभिनेत्री झी मराठी)मा.ॲड.सौ नुतन बाबर(सरकारी वकील सातारा)मा.सौ वैशाली जाधव(रंगभूषा कलाकार)मा.सौ तनया घोरपडे(कुटुंब सल्लागार सातारा)मा.स्नेहाजंली ननावरे(नौदल अधिकारी)डॉ सौ.पोरे(डॉक्टर)मा.सौ.कुलकर्णी मँडम (संगीत शिक्षिका)मा.कु.प्रिंयाका जायगुडे(अग्निवीर)मा.सौ शामली शेलार(शिक्षिका)या नारी शक्तिना सन्मानित करण्यात आली आहे.संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.अरुण राजपुरे,उपाध्यक्ष मा.आप्पा जाधव,सचिव मा.ॲड पंडित गायकवाड,खजिनदार मा.दत्तात्रय ढमाळ,सदस्या कु.श्वेता पानसरे ,सदस्या मा.सौ रुपाली राजपुरे,मा.सतिश इंदलकर(राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी)मा.सौ.सविता शिंदे(महाराष्ट्र राज्य अध्यक्षा महिला आघाडी) मा.सौ नेहा वाशिवले(युवती अध्यक्षा सातारा जिल्हा)मा.सौ हर्षला सोनावणे (उपाध्यक्षा सातारा जिल्हा)मा.सकेंत चव्हाण(जनसंपर्क अधिकारी सातारा)यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रत्येक वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येतो. संस्थेचे ध्येय उदिष्टे महिलाची सुरक्षा,कौशल्य शिक्षण, रोजगार, आरोग्य, आर्थिक व्यवस्थापन,ताणतणाव,नियोजन,मार्गदर्शन कायदेविषयक मार्गदर्शन,अशा व्यापक मुद्यावर संस्था सक्षमपणे काम करत असल्याची माहिती डॉ अरुण राजपुरे यांनी दिली.या कार्यक्रमामध्ये इतर अनेक मुली व महिलांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले.१५० महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमात विविध कलाकारांनी नृत्य व गाणी सादर केले.वाई येथील टिळक ग्रंथाल यात झालेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र परीसरातुन कौतुकाच वर्षाव होत असुन या कार्यक्रमाचे उष्कृट नियोजन केल्यामुळे सर्व नारी शक्ती वर्गानी महिला सक्षमिकरणाचे आभार व्यक्त करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर शेवटी डॉक्टर अरुण राजपुरे यांनी सर्वाचे आभार मानले.

error: Content is protected !!