मा.आमदार अनिल(भाऊ)बाबर यांना मंत्रीपद मिळावे म्हणुन शेटफळ गावचे शिवाजी गायकवाड यांनी लिहले रक्ताने मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना पत्र
नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख) -७१ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने चक्क आपल्या रक्ताने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र मा अनिल भाऊ बाबर यांचा मंत्रिमंडळात समावेश करावाून पत्र लिहिले सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथे राहणारे शिवाजी कृष्णा गायकवाड वय वर्ष 71 यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून खानापूर आटपाडी मतदारसंघाचे पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर यांचा मंत्रिमंडळात समावेश करून घ्यावा आटपाडी खानापूर तालुक्यातील दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा विकास कामाची गंगा अशीच पुढे जावी म्हणून व त्यांनी केलेल्या आजवरच्या कामाची पोचपावती म्हणू मंत्री मंडळात समावेश करून आम्हा शेतकऱ्यांचा सन्मान करावा असे आशयाचे पत्र मा.मुख्यमंत्री शिंदे यांना लिहले आहे.