!!सहज एक चिंतन!!—–श्री संत ज्ञानेश्वर व सहजयोग–

नवचैतन्य टाईम्स वाई(मा.प्रा संभाजी लावंड)आत्मतत्वाचे ज्ञान,मानव कुळास प्राप्त व्हावे.त्यायोगे देवत्व प्राप्तीचे विहीत ज्ञान आवगत करता यावे.मानवाचे उत्थान घडावे ,याच विचारांचे स्फुरण काळाची गरज म्हणून आर्यावर्तात विकास पावण्याचे अवस्थेवर येऊन ठेपले होते.तो कालखंड हा रामायण व महाभारत पूर्व आहे.संपुर्ण विश्वातील देश फक्त भारत भुमी वरील प्रमुख,पाप नाशक असणाऱ्या नद्या पैकी हिमालयात उगम पाव लेल्या यमुनेच्या किनाऱ्यावरील गहन शांतता,गुढ अरण्ये,की जेथे शिव शक्तीस चर्चा करण्यास योग्य वाटली.हा भाग दिल्ली,आग्रा,मथुरा,व इटावा याच भाग तात्कालिक प्रसंगास जुळतो आहे.सुंदर वनश्रीने विनटलेला हा भुप्रदेश यमुनेचाच किनारा अनादी काळा पासून शिवशक्तीची वाट पहात होता.मग सिध्द करुनी नंदि केश्वर!* हींडता आले महि वर!रमोनी वर्तती उमा ईश्वर!यमुने तटी येऊनी पोह चले!!(नवनाथ अध्याय १ला)ही घटना शुभ्र धवल बर्फाच्छादित मानवविरहीत असा अघळ पगळ परसरलेली हिमालय पर्वत राजी नाही. ते स्थल कैलास पर्वत सुध्दा हे वाचकांनी नीट समजून लक्षात घ्यावे.शुभ्र धवल हिम कणांच्या वर्षावातुन आकाश मार्गे नंदीवर बसुन विहार करत करत ते योग्य स्थानी पावले.उभयतांच्या दिव्य व सुक्ष्म शरीरातुन प्रकाश दिप्ती परा वर्तित होत होती.उभयतांच्या चर्चे तुन आत्मसुखाचा महापुर वाहु लागला.आत्मज्ञान प्राप्ती संदर्भात पार्वतीने अंतर्मुख होऊन प्रश्नांची विचारणा केली.ते शिवांनी जो उपदेश केला ती ओवी अशी आहे.तिते तो मंत्र उपदेशिता!मच्छिं तेथे होती सत्यता!तो उपदेश शब्द गर्मी तत्वता!मच्छिंद्राने ऐकला!!(नवनाथ अध्याय १ला. गुह्य ज्ञान बर्फाच्या अतरंगी स्थित असलेल्या माशांच्या उदरी मच्छिंद्रनाथांना सहज श्रवण झाले.कालांतराने ते आत्मज्ञान त्यांनी गोरक्ष नाथांना सांगितले.गोरक्षनाथांनी ते आत्मज्ञान गहिनी नाथांना दिले.तेच आत्मज्ञान गहिनीनाथांनी नासिक प्रांती त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी या डोंगरा वरील एका गुहेत होते.ते त्यांनी पुढील भविष्य ओळखुन अलंका पुरीचे विठ्ठलपंत यांचा जेष्ठपुत्र श्री निवृत्ती नाथांना शिकवले.परंतु ते ज्ञान अमुर्त निराकार व निर्गुन स्वरुपात होते. ते कुंडलिनीचे जाग रण व साक्षात्कारी अनुभव अक्ष रांत लिहण्याचा प्रयत्न कोणी ही केला नाही.ज्यांनी समाधी लावली त्यातील माहीती त्यांनी कोणा सही न सांगितल्याने किंवा न लिहील्यामुळे ते ज्ञान लोप पावले होते.योगा योगाने श्री निवृत्ती नाथांनी कुंडलिनी प्राप्तीचे वस्तुनिष्ठ ज्ञान श्री.ज्ञानेश्वरांना समोर बसवुन सांगितले. ते ज्ञान आपण गुरुच्या आशीर्वादाने लिहु शकलो असा ही अभिप्राय ग्रंथात वाचाव यास मिळतो आहे.आणि संत ज्ञानेश्वरानी कुंडलिनी संदर्भात ज्ञानेश्वरी ग्रंथातील सहाव्या अध्यायात विस्तृत वर्णन केले आहे.वाचताना कोणताही साधक गडबडुन जाऊ शकतो.ते आपणास सर्व अशक्य व त्या पात्रतेचे आपण नाही.असा अपराधी भाव निर्माण होतो.कुंडलिनी जागरण हा प्रकार फक्त सिध्द,हटयोगी यांचे करिता आहे.असा रिवाज समज समाज मनात भिती निर्माण करत होता.त्यामुळे संसारी लोकांसाठी हा कुंडलिनी योग नाही,असाच अर्थ निघतो.श्री.निर्मला माताजींनी सहजयोग सर्व साधकांना मिळवून दिला.संसारी माणसांना कुंडलिनी जागृतीचा वैयक्तिक अधिकार आहे.त्यासाठी त्यांनी असंख्य प्रयोग समाजात राहुन आखिल विश्वाती ल लोकांना सामुदायिक पध्दतीने करून दाखवले. आपणच आपले गुरु बनु शकतो हा नवा शोध अंम लात आणला.बुवा, महाराज संन्यासी,धुर्त,लबाड,व अगुरुकडे जाण्याची गरज नाही.ज्ञानेश्वरा च्या काळात विद्वान खुप होते.त्यामुळे ते ज्ञान व वर्णन सामान्य संसारी माणसाला आकलन होत नव्हते.या करता श्री.माताजींनी तोच ज्ञानेश्वरीतील कुंडलिनी जागृतीचां प्रकार सहज व सोप्या पध्दतीने सांगितला आहे.गुरु शिष्य या परंपरेला छेद देवुन,अगुरुं यांच्या तावडीतून समाजाची व लाखो साधकांची सुटका केली.सहज हा शब्द नाथ संप्रदायात पुढे वारकरी साहित्यात आलेला आहे.आदि नाथ उमा बीज प्रगटले!मच्छिंद्रा लाधले!सहज स्थिती यावरुन सहजयोग हा शिव पार्वती यांच्या सुक्ष्म संवादात त्याची खोलवर बीजे रुजलेली सापडतात.
”””””””प्रा.संभाजी लावंड.”””””””

error: Content is protected !!