उमराणी येथील हजरत खाजा बंदेनवाज उरुसानिमित्त भाविकांनी बहूसंख्येने हजेरी लावून दर्शनाचा लाभ घ्यावा -मा.रफीकअहंमद मिरजी
नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(नजीरभाई चट्टरकी)-हिंदू-मुस्लीमांच्या ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अत्यंत जागृत समजल्या जाणाऱ्या उमराणी येथील हजरत ख्वाजा बंदे नवाज यांचा उरुस सालाबादप्रमाणे रविवार दिनांक चार तारखेपासुन मंगळवार दिनांक सहा जून 2023 पर्यंत सलग तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे सलग तीन दिवस चालणाऱ्या या उरूस महोत्सवात भरगच्च असे धार्मिक व कर्मणुकीचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील उमराणी येथील खाॅजासाहेबांवर निस्सीम भक्ती ठेवणाऱ्या सर्व भाविकांनी या उरूसात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गाह कमिटीचे मुख्यस्थ जनाब रफीक अहमद मिरजी यांनी केले आहे.उरुसाच्या पहिल्याच दिवशी सकाळी नऊ वाजता गुस्ल-ए-खुसूसी,फातेहा खानी,विविध धार्मिक कार्यक्रमानुसार संदल,गलेफ,फुलांची चादर चढवण्यात येणार आहे.संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत वाद्यवृंदासह वाजत गाजत खाॅजा साहेब यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.रात्री दहा वाजता इचलकरंजी येथील प्रसिद्ध कव्वाल राज चिस्ती व औरंगाबाद येथील शबनम बानू यांच्यामध्ये कवालीची जुगलबंदी पाहावयास मिळणार आहे.दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक ५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करजगी आणि बोर्गी येथील गायन संघाच्या वतीने करबल गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम तसेच सकाळी दहा पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे,दरम्यान अकरा वाजता येथील बाबलादी सदाशिव मुत्त्या मठाचे मठाधिपती महास्वामी आप्पाजी यांनी दर्गास भेट देऊन दर्शन घेणार आहेत रात्री दहा वाजता श्री गुरु फकीरेश्वर नाट्यसंघ यंडीगेरी बागलकोट यांच्या कडून “मगा होदरू मांगल्य बेकू”हे कन्नड सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचे सत्कार व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन ही कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे तर मंगळवार शेवटच्या दिवशी संपूर्ण दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत याच बरोबर येथील श्रीमंत डफळे राज घराण्याकडून राज वाड्यावरुन खाॅजा साहेबांना मानाचा गलेफ व फुलांची चादर चढवण्याचा कार्यक्रम पार पडणार व उरुसाची सांगता होणार आहे.संपूर्ण उरूस महोत्सवाचे आयोजन अकबर साहेब मिरजी, कलीमहंमद अपराध,सैफन जातगार,बडकलसाहेब जातगार,हुसेनबादशाह मुजावर व समस्त हिंदू-मुस्लिम समाज बांधवांच्या कडून करण्यात येणार आहे.