आटपाडी तालुक्यातील ग्रामीण रस्त्याच्या प्रश्नासाठी मनसे उतरले रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन यशस्वी

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-आटपाडी तालुक्यातील खेडे गावात जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची दुरावस्ता झाली आहे तरी प्रशासनाने या कडे दुर्लक्ष करत आहे . तसे पहाता करगणी ते शेटफळे,करगणी ते पात्रेवाडी तळेवाडी त्याच बरोबर मासाळवाडी रस्ता या रस्त्यावरून राजपथ इन्फ्राक्रॉम या कंपनीने ओहरलोड वाहतुक करून रस्ते खराब केले आहेत.
गेली तीन वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने पाठपुरावा करत आहे .परंतु गेंड्याच्या कातडीचे अधिकारी याकडे साईस्कर पणे बगल देण्याचे काम करत होते अखेर मनसेने रास्ता रोको आंदोलन केले यामध्ये माळेवाडी,शेटफळे,पात्रेवाडी,तळेवाडी येथील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.हे दिड तासाचे आंदोलन यशस्वी रीत्या पार पडले.वाहन्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनास राजपथ इन्फ्राकॉन कंपनीवर 5 कोटी 35 लाख 37 हजार एवढ्या रक्कमेची दंडात्मक करवाई करण्यास एक महिन्याचा कालावधी दिला आहे.पंचायत समिती कार्याकारी उपअभियंता देवांग साहेब यांनी आंदोलन ठिकाणी येऊन करवाईचे लेखी अश्वासन दिले व त्या नंतर आंदोलन थांबवण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हा सचिव राजेश जाधव,सत्यवान पिंजारी उपजिल्हा अध्यक्ष,प्रकाश गायकवाड कृषी तालुका अध्यक्ष,मारुती खिलारी, साजिद आगा खानापूर तालुका अध्यक्ष,आपुल बुधावले गणेश जाधव खानापूर तालुका उपाध्यक्ष,आपुल बुधावले विटा, रासपचे लक्षण सरगर,समाधान जगदाळे,मनीषा खांडेकर,बालिका भोसले,नाथासो यमगर,नीलकंठ देशपांडे,आर पी आय चे रघुनाथ कांबळे चैतन्य शिंदे,गणेश यमगर,संजय पवार,संपत पवार उपस्थित होते.

error: Content is protected !!