आटपाडी तालुक्यातील कोळेकर वस्ती जिल्हा परिषद शाळेतील आठ वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षकाकडून अमानुष मारहाण तक्रार देण्यास पालकाची असमर्थता
नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या कोळेकर वस्ती येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी ला शिक्षकांनी अमानुषपणे मारहाण केलीची घटना समोर आली आहे मात्र या घटनेबाबत पालकांनी मौन बाळगले आहे शिक्षक बाबासाहेब शेख यांनी विद्यार्थिनीला अमानुषपणे मारहाण करून घरी सांगितले तर आणखी मारहाण केली जाईल अशी विद्यार्थिनीला भीती घातल्याने विद्यार्थिनींनी घरात काहीच सांगितले नव्हते मात्र आंघोळ करण्यासाठी कपडे काढले असता हा प्रकार पालकांच्या लक्षात आला या प्रकारा बाबत पालकांनी प्रथम तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनचा रस्ता धरला होता मात्र शिक्षकाने राजकीय वजन वापरून वरिष्ठपातळीवरून गावातील प्रमुख मंडळींना मध्यस्थ करून या प्रकरणावरती पडदा टाकण्यास पालकांना भाग पाडले आहे त्यामुळे या प्रकरणावरती पालक बोलण्यास तयार नाहीत आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील दोन विस्तार अधिकारी घटनेची चौकशी करण्यासाठी गेले होते या ठिकाणी पालकांकडून कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आल्याने मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही बाबासाहेब शेख या शिक्षकाकडून शाळेतील अन्यही मुलांना क्रूरपणे मारहाण केली जात असल्याचे विद्यार्थी सांगत आहे त्यामुळे अशा शिक्षकावरती कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे लहान मुलांचे शोषण होऊ नये त्यांच्या बरोबर क्रूरता होऊ नये म्हणून अनेक कायदे बनवण्यात आले आहेत परंतु सध्या कायदे असताना सुद्धा लहान मुलांच्या सोबत क्रूरता होत असल्याचं येथे समोर येत आहे कायद्याने सुद्धा घटनेची गंभीरता पाहून कारवाई करण्याची आवश्यकता आहे