एक विचार माझ्या शिक्षकांसाठी प्रत्येक शाळेतील शिक्षकांसाठी प्रत्येकाच्या मनातील शिक्षकांसाठी
नवचैतन्य टाईम्स वाई-प्रतिनिधी(ह.भ.प.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले)डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चरणी नतमस्तक 🙏🏻
काळानुरूप बदलणाऱ्या,शिक्षण व्यवस्था पेलणाऱ्या शिक्षकांसाठी,नवी पिढीला घडवणाऱ्यासाठी.
लहानपणीच्या आठवणी तील शिक्षकांसाठी,आणि यौवन वयात योग्य मार्गदर्शन करणारया प्राध्यापकांसाठी
निर्जीव वस्तू त ‘अवस्था’ व सजीव प्राण्यासाठी ‘व्यवस्था’ ही महत्तवाची समजवून सांगणारया माझ्या शिक्षकांसाठी,”इमारत बनायला वेळ लागत नाही,शाळा बनायला वेळ लागतो,एक आदर्श शाळा बनण्यासाठी,संस्था, मुख्याध्यापक,शिक्षक,पालक,यांच्यामध्ये
खराखुरा मेळ लागतो”.
“शाळा ही दोघांचीच असते ,ज्ञान देणार्याची व ज्ञान घेणाऱ्याची असते”.
खऱ्या ज्ञानाची आर्त उणीव ही भासते.
विद्यामंदिरातील ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणाऱ्यानो,आज वेळ आली आहे शिक्षक दिनानिमित्त मनातील भावना व्यक्त करण्यासाठी,
शिक्षकी पेशा नोकरी नसून” सेवा “हे मनात रूजवण्यासाठी,
पुण्याईची पूंजी साठवण्यासाठी, नेत्रांच्या कडा ओल्या करण्यासाठी,
शाळा ही तिजोरी,विद्यार्थ्यी हा ठेवा,ज्ञानाची उघडवया दारे शिक्षकी पेशा ही सेवा.
शिकते ज्ञान डोळे उघडूनी नवी पिढी विद्यार्थ्यांची,
परी परीक्षेवेळी काॅपी केल्यावर भीती शिक्षकांची ,
काॅपीचा दृष्ट विचार घालवूनी,त्यांचा अभ्यास हा घ्यावा,
ज्ञानाची उघडवया दारे शिक्षकी पेशा ही सेवा.
सुशिक्षित, सुसंस्कृत मुले करण्यासाठी ज्ञान मार्ग खरा हा धरावा,
शक्य होईल तेवढा हा पुण्य परमार्थ करावा,शिक्षकांना यासाठी संस्थेचा आशिर्वाद असावा,
ज्ञानाची उघडवया दारे शिक्षकी पेशा ही सेवा.
शिक्षकी पेशा ही नोकरी नव्हे,तिज बोलती सेवा,
प्रत्येक दिवशी आनंदी जीवनाचा मिळतो इथे ठेवा,
प्रामाणिकपणे सेवा करिता मिळतो सद्बुद्धी चा ठेवा,
ज्ञानाची उघडवया दारे शिक्षकी पेशा ही सेवा.
अभ्यासक्रम,पाठ्यक्रम, यांच्या व्यावहारिक जीवनाशी विद्यार्थ्यांना ताळमेळ शिकवावा,
शाळेत च आपुल्या ज्ञानाचा, विद्यार्थ्यांसाठी मळा हा कसावा,
प्रत्येक क्षेत्रात माझ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा ठसा हा उमटावा,
ज्ञानाची उघडवया दारे शिक्षकी पेशा ही सेवा.
शारीरिक विकासासाठी, मैदानावर विद्यार्थ्यी खेळावा,
मानसिक,बौद्धिक विकासासाठी योगा हा करावा,
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच एकमेव उद्देश असावा,
ज्ञानाची उघडवया दारे शिक्षकी पेशा ही सेवा.
विद्यार्थ्यांमध्ये,पालकांमध्ये,
शिक्षकांबद्दल,आदर असावा,
सर्व वृत्ती,कृतीतून आदर दिसावा,
शिक्षकांनीही एकमेकांबद्दल आदर ठेवावा,
एकमेकांबद्दल वागण्या-बोलण्यात हेवा दावा नसावा,
ज्ञानाची उघडवया दारे शिक्षकी पेशा ही सेवा.
संस्था,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,मिळोनी घडावी समाजाची सेवा,
तरच प्रत्येकाचा जीवनामध्ये मिळेल आनंदाचा मेवा,
सुखी,समाधानी, पृथ्वी तला वर प्रत्येक जण असावा,
कारण मरेपर्यंत प्रत्येक जण हा विद्यार्थ्यी च असतो हे मानवा ,
शिक्षक दिनाच्या निमित्ताने मागणे
मागते मी देवा,
खरच!च ज्ञानाची उघडवया दारे शिक्षकी पेशा ही सेवा.
शिक्षक दिनानिमित्त सर्वांना ज्ञानमय शुभेच्छा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ह.भ.प.प्रा.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले