मराठा समाजावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे बंद पाळून निषेध
नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(जगन्नाथ सकट)मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला.बंदला व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली (सराटी)येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला.याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला.गावातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवून व्यापारी नागरिक व ग्रामस्थांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ब्रीजमोहन पाटील,प्रशांत दिलीप पाटील ,श्रीकांत पवार,मोहन पाटील,वैभव सरवदे,अभिषेक मंडले,प्रदीप पाटील,इप्पण पाटील,रोहित पाटील यांचेसह सरपंच,उपसरपंच,
ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.बंद शांततेत पार पडला मराठा समाजावरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गावातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते बंदच्या वेळी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुची गावामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला होता