एक विचार माझ्या भगवान, परमात्मा श्रीकृष्णासाठी,
नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले)
एक विचार माझ्या भगवान, परमात्मा श्रीकृष्णासाठी,
गवळणींच्या ‘कान्हासाठी’,
गाईंच्या ‘गोपाळासाठी’ ,
यशोदा मातेच्या – नंद बाबांच्या ‘नटखटासाठी’,
कारावासातून सुटका करणार्या देवकी-वसुदेव च्या ‘ पुत्रासाठी’,
निखळ प्रेम,शुद्ध भाव असणार्या गोपीकांच्या ‘मधूसुदनासाठी’,
अबोल प्राणी – मात्रांच्या मंत्र मुग्ध करणार्या सुमधुर ‘मुरलीधरा’साठी,
महभारतातील अर्जुनाचे सारथ्य करणार्या ‘केशवा’साठी,
एक विचार जगातील पहिल्या स्त्री -पुरूष पटवून देणार्र्या श्री ‘अनंता’च्या समानतेसाठी,
कालिया मर्दन करून जलप्रदूषण रोखणार्या ‘पद्मनाभा’साठी,
एक विचार द्रोपदी च्या बहिण भावाच्या प्रेमाच्या ‘नारायणा’साठी,
मैत्री च्या विश्वातील, सुदामा च्या – ‘कन्हैय्या’साठी,
पुतणा,कंस,यांचा उद्धार करणारया ‘श्री कृष्णा’साठी,
सदाशिवाच्या चंद्र कोरीप्रमाणे, डोईवर मुकूटात मोर पीस धारण करणार्या ‘सहजरूपा’साठी,
सुदर्शन चक्राने वाईटाचा नाश करणार्या ‘चक्रधरा’साठी,
विश्वाचा ‘विश्वभंरा’साठी, करूणेचा सागर त्या ‘करूणाकरा’साठी
कमल नयन लक्ष्मी कांता ‘कमलापती’,साठी
कामिनी ‘मोहन’ मदन मूर्तीसाठी,
क्षीरसागरी शेषशयन करणार्या ‘शेषशयनासाठी,
समुद्र मंथनातील ,अमृत दानवांना देणार्या ‘मनमोहिनी’साठी,
बळी राजाच्या तीन पग जागा मागणार्या ‘वामनमूर्ती’साठी,
सगुण-निर्गुण रूपासाठी,’बाळरांगणा’साठी,
वासुदेव-देवकी ‘नंदनासाठी’,
गरूडावर आरूढ असणार्या माऊली रूप घेणार्या जगाच्या ‘मालकासाठी’,
माझ्या भोळ्या – भाबड्या भक्तीच्या आकर्षण करणार्या या कृष्णासाठी
विश्वसंत तुकारामांच्या विनवणीसाठी,
भवबंधने सोडवणार्यासाठी
माझा हा विचार जगाचे कल्याण करणाऱ्या परमात्यामासाठी🙏🏻🙏🏻🙏🏻
” वारकरी अभंग”
श्री अनंता मधुसूदना|पद्मनाभा नारायणा|
श्री अनंता मधुसूदना|पद्मनाभा नारायणा|
जगव्यापका जनार्दना|आनंदघना अविनाशा || 1 ||
सकल देवाधिदेवा|कृपाळुवा जी केशवा|
महानंदा महानुभवा| सदाशिवा सहजरूपा || धृ ||
चक्रधरा विश्वम्भरा|गरुडध्वजा करुणाकरा |
सहस्त्रपादा सहस्त्रकरा| क्षीरसागरा शेषशयना || 2 ||
कमलनयना कमलापती| कामिनीमोहना मदनमूर्ती|
भवतारका धरी त्या क्षिती| वामनमूर्ती त्रिविक्रमा || 3 ||
अगा ये सगुणा निर्गुणा|जगज्जनित्या जगज्जीवना |
वासुदेव देवकी नंदना| बाळरांगणा बाळकृष्णा || 4 ||
तुका आला लोटांगणी|मज ठाव द्यावा जी चरणी |
हेची करीतसे विनवणी| भवबंधनी सोडवावे || 5 ||
पुनश्च राधा – कृष्णाच्या सर्व भक्तांना भक्तीमय शुभेच्छा 💐💐
!!!!हरे रामा,हरे कृष्णा,कृष्णा कृष्णा हरे हरे!!!!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻