सहज निर्मल रचना

नवचैतन्य टाईम्स वाई (प्रा.संभाजी लावंड)
तो बाल कृष्ण,गोकुळी नांदतो!
दहि दूध खातो !आवडीने!!१!!
मधुर बासरी,वाजविता स्वर!
गाईगुरे सुंदर ! राखतो हा !!२!!
गोकुळीचे लोक,विसरती भान!
अनाहत धुन! ऐकताना !!३!!
कालिंदिचा डोह,विरहात पडे!
सावळे रुपडे!पहाताना!!४!!
दासशंभु म्हणे,विशुद्धीचा देव!
राधा कृष्ण राव!राज्य करी !!५!!
“”””””””‘””‘””'”””””””””””””””””””””””””””
नाद हा अग्नी तत्व व जल तत्व एकत्र आल्याने उसळतो.तेथे तेजो भार प्रस वतो व प्रकाशांचे साम्राज्य पसरते. हे क्षेत्र विष्णु मायेचे आहे.गायी गुरा मागे मुरलीच्या स्वरांनी परिसर व प्राणी त ल्लीन होऊन जात.गोपीं धुणी धुताना, घरकाम करताना,दळताना,कांडताना, लोणी घुसळताना व सडा टाकताना, यमुनेचे जल भरताना स्वरामुळे त्या भाव समाधित जात.व जाग्यावरच वजन रहित बनत.कालिंदी चा डोह कृष्ण विरहाने व्याकुळ होई.श्री कृष्ण व राधा व विष्णु माया ही सहजातील वि शुध्दी वरील देवता आहेत. त्याचे जाग्र णाने अवघड कार्ये
सुलभ होतात.श्री माताजी म्हणतात, “विशुध्दी चक्रांचे पूर्ण स्वरुप जाणायचे असेल तर निर्लिप्त भावाने साक्षीभाव प्रस्थापित करावा.आई बद्दल प्रेम हृद यात ठेवावे, म्हणजे त्या आतील शत्रु स्वच्छ करतात.त्यांचे एक रुप म्हणजे योगेश्वर व दुसरे रुप विराट होय.योगी जेंव्हा आकाश तत्वावर कंट्रोल करतो म्हणजे आकाश तत्वात प्रवेश करतो. तेव्हा तुम्ही निर्विचार अवस्थेत जाता. योगेश्वराचा एक गुण म्हणजे ते कशा तही गुंतलेले नव्हते.पूर्णपणे निर्लिप्त होते.विशुध्दी चक्र म्हणजे पूर्ण आत्म विश्वास,यांचा अर्थ पूर्ण सूज्ञता, पूर्ण धर्म,पूर्ण प्रेम व पूर्ण सुंदरता व पूर्ण परमेश्वर,ते विराट होते.आपल्या मेंदूत विराटाचे स्थान आहे.आपल्यात अप राधीपणाची भावना वाढली की,आप ली डावी विशुध्दी पकडते. इतरावर टीका करु नये.व कोणाच्या ही वर्चस्वा खाली राहू नये.जेव्हा उजवी विशुध्दी पकडते,तेव्हा आपण वाणीचा गैर उप योग करत असतो.कर्ता भाव वाढतो, क्रोध अनियंत्रीत होतो. जेव्हा मध्यात असतो,तेव्हा आपण संतुलनात असतो माधुर्य शक्ती कार्य करते.साक्षी भावाने परमेश्वराची लीला आपण पहात अस तो.तुमच्यात दैवी चतुरता येते.आपण विराटाचे अंग प्रत्यंग बनण्याचे मार्गावर रहातो. आपल्या अहंकाराची व प्रति अहंकाराची सुरुवात येथुन होते. आप ल्या उत्थानातील हे महत्त्वाचे चक्र आहे.श्री.माताजींना श्री कृष्ण स्वरुपात शरण जाणे म्हणजे आपला अहंकार व प्रति अहंकार समर्पित करणे. दासशंभु आपणास सर्वांना विनंती करत आहे की,तुमचे प्रेम दुसऱ्यांचे हृदयापर्यंत पोहोचू द्या.विश्व बंधुत्व शोधू या,सहज अशा आपले पणाच्या माधुर्य यातुन विराटाचा साक्षात्कार निश्चित होणार आहे.
प्रा. संभाजी लावंड.
सदर लेखन आईच्या चरणी!

error: Content is protected !!