एक विचार गोविंदा साठीप्रत्येक गावातील,प्रत्येक घरातील, राधा गवळणीसाठी,प्रत्येक च्या गोपाळासाठी, प्रत्येक गल्ली बोळातील,वाड्या वस्तीतील दहीहंडी साठी
नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(ह.भ.प.प्रा.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले )
‘ गोपाळकाला ‘
**गो म्हणजे इंद्रिय*
पाळ म्हणजे पालन करणारा*
काला -मनुष्य जन्मला का आला?*
याचाच अर्थ गो पाळ काला
गायींच्या मागे गुराखी म्हणून असणारा,
गोकुळच्या गवळणींचे दही, दूध ,लोणी गोपाळांबरोबर पळवणारा,
“गोविन्दा रे गोपाळा,यशोदेच्या तान्ह्या बाळा, तुझ्या घरात नाही पाणी,घागर उतानी रे गोपाळा,”
“आला रे आला गोविंदा आला,गवळांच्या पोरीनों मटकती संभाळा
गाणी सहज ओठावर येणारा असा हा उत्सव,
उत्साह वाढवणारा उत्सव,
अनेक थर पार करून, चित्तथरारक दहीहंडी,
अनेक ठीकाणी उंचावरची दहीहंडी पाहून गोपाळांची काळजी करावी की त्यांचे कौतुक करावे,हा प्रश्न पडणारा उत्सव,
कोणे एके काळी ,गोकुळ एक गाव,त्या गावाचे होते नाव
राधे चल माझ्या गावाला जावू ,सारे गोकुळ फिरूनी पाहू,
वसुदेव माझे पिता आहे देवकी माझी
माता त्यांचे आपण दर्शन घेवू
एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा,
अनेक गवळणी एकट्या कान्ह्यासाठी आणि गोपाळांची आतुरतेने वाट पहणार्याचे वर्णन करणारा हा उत्सव,
दूध, दही,लोणी यामध्ये असणारे अनेक जीवनसत्वे समजवून, खाद्य संस्कृती चे दर्शन घडवून देणारा उत्सव,
नटखट गोपाळांचे थर बनवताना एकीचे महत्व व मानवी मनोर्यांचे चित्रण डोळ्या पुढे सादर करणारा उत्सव,
गरीब घरच्या सवंगडी च्या शिदोरी चे एकत्र मिसळून, दह्याचे घुसळण करून काढलेले लोणी,गवळणींचे डोळ्यात येणारी पाणी , मटका पळवून,नेण्यासाठी करणारी विनवणी गवळणी या सर्वांची करूण कहाणी
आठवण करून देणारा उत्सव
अशा या
💐💐💐गोपाळकाल्याच्य सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
(ह.भ.प.प्रा.सौ.सरस्वतीताई भोसले-वाशिवले )