श्री भैरी भवानी प्रतिष्ठान,(वीर)व वालावलकर हॉस्पिटल डेरवण सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
नवचैतन्य टाईम्स कोकण प्रतिनिधी(दिपक कारकर)वीर गावचे भूमिपुत्र दशरथ,चंद्रकांत,शशिकांत जावळे बंधूंचा समाजाला प्रेरणादायी उपक्रमाचे औचीत्य साधुन उपरोक्त संयोजकांच्या वतीने गुरुवार दि.२१ सप्टेंबर २०२३ रोजी,सकाळी ०९ ते ०५ वाजेपर्यंत, ग्रुप ग्रामपंचायत सभागृह,वीर देवपाट,( ता.चिपळूण, जि.रत्नागिरी )येथे विविध आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात जनरल फिजिशियन,ह्रुदयविकार,ऑक्सीजन लेवल,ऑथेपेडिक,स्त्री रोगतज्ञ, मधुमेह,इसीजी यावर तपासणी करण्यात येणार आहेत.या शिबिरात डेरवण हॉस्पिटल मधिल संचालिका डॉ.सुवर्णा पाटील मॅडम,आरोग्य सेवक संदीप पाटील, सचिन धुमाळ तसेच वीर गावच्या सरपंच महोदया श्रेया वीर, समाजसेवक संतोष जैतापकर,नारायण दुर्गोळी,रमेश दूर्गोळी,वसंत जावळे, रमाकांत जावळे व वाडीतील/पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.दरम्यान अनेक आजारांवर उपयुक्त मार्गदर्शन मिळणार आहे.वीर गावातील नागरिक यांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात येत आहे.सामाजिक बांधिलकी जपण्याची भावना मनी रुजवत अनेक उपक्रम राबविण्यात कटिबध्द व अग्रेसर असणाऱ्या श्री भैरी भवानी प्रतिष्ठान,वीर तर्फे सलग दुसऱ्या वर्षातील नियोजित उपक्रमाचे व संयोजक दशरथ,चंद्रकात सह शशिकांत जावळे बंधूंचे पंचक्रोशीसह विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.