आटपाडीचे तहसीलदार बी.एस माने यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन चाळीस गावातील बेकायदा होणारा वाळू उपसा थांबवा -मा.संतोष हेगडे

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-आटपाडी तालुक्यातील चाळीसगावातून गौण खनिज उत्खनन ( वाळू) तहसीलदार यांच्या आशीर्वादाने कोट्यावधी रुपयाची वाळू तस्करी जोमाने चालू असल्याचे बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी मान देशातील मान नदीच्या वेगवेगळ्या गावांमध्ये वाळू तस्करीचे फोटो व उत्खनन केलेले खड्डे सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.
कोट्यावधी रुपयाची वाळू चोरीला गेली आहे. कुंपनच शेत खायला लागलं तर काय सर्वसामान्यांनी काय करायचं असा प्रश्न पडला आहे. याकडे तहसीलदार बी.एस. माने दुर्लक्ष करतात मग न्याय कोणाला मागायचा ?
यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री ,महसूल मंत्री तसेच गृहमंत्री यांना निवेदन दिली होती .अद्यापही तहसीलदार यांच्या कामाची चौकशी झाली नाही. म्हणून मुंबईतील आझाद मैदान येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे तहसील व प्रांत अधिकारी यांची वाळू तस्करी संबंधात सखोल चौकशी व्हावी . तालुक्यातील ओढे व नदी पात्रातील लाखो ब्रास वाळूचे उत्खननाचा बोजा तहसीलदार यांच्या मालमत्तेवर चढवण्यात यावा. तहसीलदार यांची गुप्त विभागाकडून वाळू तस्कर यांच्या संबंधित व्यवहाराविषयी सखोल चौकशी करण्यात यावी.
तहसील कार्यालयातील महसूल विभागाची लात लुचपत मध्ये सापडलेले कर्मचारी मेहबूब बागवान यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. कारण वाळू तस्कर यांचे हप्ते गोळा करून तहसीलदारांना देत असल्याचा संशय होता.
त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये दिवस आणि रात्र वाळूचे उत्खनन करत होते. करत आहेत.तहसीलदार यांच्या विरोधात अनेक संघटना राजकीय पक्षाच्या वतीने वारंवार वाळू तस्करी संबंधात तक्रारी झालेले आहेत .सगळे पुरावे असून सुद्धा तहसीलदार यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही,तरी आपण तहसीलदार यांना पदावरून बडतर्फ करावे त्यांचे निलंबन करावे ,अशा मागण्या घेऊन बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे सांगली जिल्हा उपाध्यक्ष देवानंद जावीर तसेच बहुजन समता पार्टीचे अध्यक्ष बळीराम रणदिवे हे आझाद मैदान मुंबई येथील बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

error: Content is protected !!