नामदेवराव सूर्यवंशी(बेडके)महाविद्यालय फलटण या ठिकाणी कार्पोरेट क्षेत्रातील आव्हाने या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नवचैतन्य टाईम्स फलटण प्रतिनिधी(दिनेश लोंढे)-दि.१६ :- श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे नामदेवराव सूर्यवंशी (बेडके ) महाविद्यालय फलटण ,अग्रणी महाविद्यालय अंतर्गत वाणिज्य मंडळ व निलया फाउंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने 16 सप्टेंबर 2023 रोजी नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय फलटण या ठिकाणी कार्पोरेट क्षेत्रातील आव्हाने या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळेची सुरुवात सरस्वती पूजन व नानांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आरिफ तांबोळी सर यांनी केले व प्रमुख मार्गदर्शिका यांचे स्वागत सत्कार प्रा.डॉ.तेजश्री राऊत पवार व प्रा.चित्रा गुळुमकर मॅडम यांनी केले
या कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका प्रा.गौरी कुलकर्णी विकास अधिकारी निलया फाउंडेशन विश्वस्त पुणे यांनी विद्यार्थ्यांना कार्पोरेट क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना कार्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत असताना येणारे विविध आव्हानांना कसे सामोरे जावे, फक्त एमपीएससी व यूपीएससी मध्येच विद्यार्थ्यांचा कल हा जास्त असतो परंतु कार्पोरेट क्षेत्रांमध्ये सुद्धा नोकरीच्या खूप संधी असतात त्यासाठी लागणारे स्किल हे विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे त्याचा प्रभाव हा त्याच्या करिअरवर होत असतो .या क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी लेखू नये. तुम्ही ज्या शाखेमध्ये प्रवेश घेतला आहे त्या शाखेला संपूर्णपणे जोखून देऊन त्यामधील कौशल्यांचा विकास करणे गरजेचे आहे. जसे की विद्यार्थ्यांनी मनाचे सामर्थ्य वाढवावे.
कार्पोरेट क्षेत्रामध्ये अपडेट ठेवणे आत्मविश्वास वाढीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणांच्या साह्याने मेहनत चिकाटी तत्परता इत्यादी गुणांचा विकास करून आपण स्वतःला परिपूर्ण बनवावें. या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी आपण ज्या संगतीमध्ये राहत आहोत त्यामुळे आपल्या करिअरचे नुकसान तर होत नाही ना याचे अवलोकन करणे गरजेचे आहे .त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संगत अशी असावी की त्यांचा आर्थिक व मानसिक उत्कर्ष होईल. म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिकत असताना आपला वेळ आपल्या करिअरकडे फोकस करावा. यासाठी त्यांनी याच क्षेत्रातील निलया फाउंडेशनचे विविध कोर्सेस चे महत्व व त्यातील प्लेसमेंट यातील वेगवेगळ्या यशस्वी व्यक्तींची उदाहरणे देऊन या क्षेत्रात नावलौकिक करण्यासाठी शुभेच्छा दिल्या ,त्यासाठी त्यांनी निलया फाउंडेशन हे विद्यार्थ्यांसाठी नेहमी तत्पर असण्याचे आश्वासन देऊन याबाबतीत काही अडचणींवर कोर्सेस वर मार्गदर्शन करण्यासाठी निलया फाउंडेशनचा भ्रमणध्वनी क्रमांक विद्यार्थ्यांना प्रदान केला. यावेळी कु.साक्षी मोहिते आणि गणेश शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे प्रा.आरिफ तांबोळी सर यांनी केले यावेळी,प्रा.डॉ.दिपक राऊत पवार प्रा.घाडगे पुनम, प्रा. कांचन कुंभार, प्रा.झेंडे मॅडम प्रा. डॉ.तेजश्री राऊत पवार प्रा.वनिता कोळेकर प्रा.चित्रा सस्ते गुळुमकर प्रा.दिपाली बागल प्रा.सोनल जाधव इ.उपस्थित होते .
तर कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवम घनवट यांनी केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे ज्युनियर व सिनियर विभागाचे सर्व विद्यार्थी सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होत्या यांच्या समवेत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

error: Content is protected !!