नांगोळे येथे पर्यावरण पूरक गणपतीचे प्रदर्शन

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- नांगोळे (ता कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा ४.० या अभियानांतर्गत केलेल्या आवाहनानुसार जिल्हा परिषद शाळा व आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या श्याडुच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणपतीच्या मूर्तीचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.याला ग्रामस्थांनीही मोठा प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे २५० शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती प्रदर्शनात ठेवल्या होत्या.यावेळी गावकऱ्यांनीही आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पर्यावरण पूरक गणपतीच्या मूर्त्या खरेदी केल्या व त्याचे विसर्जनही ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या योजनेतून तयार केलेल्या अमृत रोपवाटिकेत माझी वसुंधरा योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करणार असल्याचे सांगितले.त्याचबरोबर गणेश मुर्तीला वाहीले गेलेले निर्माल्यही ग्रामपंचायतीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या निर्मल्यकलशात टाकणार आसल्याचे सांगितले.
सदर प्रदर्शनास गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव,माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर,सरपंच सौ छायाताई कोळेकर,उपसरपंच दादासो हुबाले,सोसायटीचे चेअरमन राकेश कोळेकरसह ग्रामपंचायत सदस्य यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सदर प्रदर्शनात अगदी उत्कृष्ट मुर्ती बनविणार्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान चिन्ह तर प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मासाळसह सर्व शिक्षक,विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत दादासो हुबाले यांनी तर आभार धनश्री पोळ-पाटील यांनी मानले.

error: Content is protected !!