बक्षीसासाठीच नव्हे तर गावाच्या विकासासाठी काम करा-गौरी पाटील

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- केवळ बक्षीसासाठीच नव्हे तर गावाच्या विकासासाठी प्रत्येकांनी झपाटून काम केले पाहिजे,त्यामुळे पुढे होणार हे सर्व चांगलेच आसते असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय तांत्रिक तज्ञ (विकास) श्रीम गौरी पाटील यांनी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत कामाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत केले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गौरी पाटील पुढे म्हणाल्या की पृथ्वी,वायू,जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावरच माझी वसुंधरा अभियान ४.० ची सुरुवात झाली आसुन त्याचे संवर्धन व संरक्षण राखणे हे आपणा सर्वांचेच काम आहे.तर जिल्हा परिषद अभियान कक्षातील दतात्रय गळवे यांनीही पृथ्वी,वायू,अग्नी,जल व आकाश या पंचतत्वानुसार माझी वसुंधरा अभियानासाठी करावयाच्या कामाची सविस्तर माहिती यावेळी विशद केली.तर गावाने माझी वसुंधरा अभि यानांतर्गत केलेल्या कामाचेही त्यांनी भरभरून कौतुक केले.
यावेळी सरपंच अमर शिंदे, उपसरपंच सुनील कांबळे,ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री अभिजित शिंदे,सागर पाटील,दिलीप शिंदे,सौ दिव्या शिंदे,सौ पवित्रा शिंदे,सौ सुमन शिंदे,श्रीमती सावित्रीबाई कांबळे,सौ विद्याराणी पवार,सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद(आण्णा)शिंदे,तंटामुक्तीचे कुलदीप शिंदे,ग्रामसेवक झैलसिंग पावरा,तलाठी वायदंडेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना पर्यावरण पूरक शपथही देण्यात आली.आभार सुनील कांबळे यांनी मानले.त्याचबरोबर गौरी पाटील व दळवी यांनी गावात माझी वसुंधरा अभियानांतर्गत चाललेल्या वेगवेगळ्या कामानाही भेटी देऊन समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!