घाटनांद्रेत ग्रामपंचायतीच्या वतीने फटाका मुक्त दिवाळीचा संकल्प
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिवाळीत फटका उडविल्याने नंतर होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदुषण टाळण्यासाठी संपूर्ण गावात जनजागृती करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या प्रांगणात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
युवा सरपंच अमर (भाऊ) शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी,शाळेचे विद्यार्थी,शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच अमर शिंदे म्हणाले की फटाके उडविल्याने ध्वनी,वायूचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असुन त्याचा मानवी आरो ग्यावर मोठा परिणाम होतो.त्याचबरोबर मोठ्या आवाजाच्या फटाक्या मुळे पशुपक्ष्यांनाही दगाफटका होतो त्यामुळे प्रत्येकांनी फटाकामुक्त दिवाळी साजरी करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
तर उपक्रमशील ग्रामसेवक झैलसिंग पावरा यांनी यावेळी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याच्या संकल्पने बाबत बोलताना सांगितले की आपण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबरोबरचग्रामपंचायतीच्या वतीने बालगोपाळांसाठी पर्यावरण पूरक आश्या किल्ल्याच्या स्पर्धा आयोजित केल्या असून त्याला योग्य बक्षिसे देण्यात येणार असल्याचे सांगितले.प्रारंभी संपूर्ण गावातून फटाकामुक्ती बाबत जनजागृती राॅली काढण्यात आली.
यावेळी सरपंच अमर शिंदे,उपसरपंच सुनील कांबळे,सदस्य सर्वश्री अभिजित शिंदे,सागर शिंदे,दिलीप शिंदे,सौ दिव्या शिंदे,सौ पवित्रा शिंदे,सौ सुमन शिंदे,सौ विद्याराणी पवार,श्रीमती सावित्रीबाई कांबळे सह तंटामुक्तीचे कुलदीप शिंदे,सोसायटीचे प्रल्हाद शिंदे,अमित शिंदे, हर्षल झांबरे,दादासाहेब शिंदे,बाळासाहेब आठवलेसह सर्वोदय हायस्कूल,जि प शाळा व अंगणवाडीचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.