गर्जेवाडीत प्रल्हादबापूंची पंचवीस वर्षाची सत्ता आबादीत
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील गर्जेवाडी ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद (बापू) हाक्के यांची पंचवीस वर्षाची सता ही अगदी आबादीत राहीली आसुन,मोठ्या चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत त्यांच्या आर आर (आबा) पाटील ग्रामविकास पॅनेलने सरपंच पदासह सात पैकी चार जागा हस्तगत केल्या आहेत तर विरोधी जय हनुमान ग्राम विकास पॅनेलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.त्यातच सताधार्यांच्या एक जागा मात्र दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिट्टी द्वारे पारड्यात पडली आहे हे विशेष.त्यांच्या या विजयामुळे परीसरातुन कौतुक केले जात आहे.
नुकतीच गर्जेवाडी (ता कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ही अगदी मोठ्या चुरशीने पार पडली.यामध्ये सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत ४०८ मतदानापैकी प्रत्यक्षात मात्र ३२८ मतदान झाले.यामध्ये सताधारी पॅनलचे आनंदा सिताराम हंकारे यांना १८५ तर विरोधी दिलीप अशोक हंकारे यांना १४३ मते मिळाली त्यामध्ये आनंदा हंकारे हे ४२ मते घेऊन विजयी झाले.
सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत सताधार्यांकडुन विजय हिंदुराव हाक्के,कविता विजय हाक्के,अर्चना सिध्दाराम हाक्के,निवृत्ती आप्पा सरवदे हे विजयी झाले.तर विरोधी पॅनेलचे आशीमा शकील मुलाणी,प्रशांत आसाराम थोरात व जनाबाई बबन सरवदे यांनी विजयी मिळविला.विशेष म्हणजे या निवडणुकीत निवृत्ती आप्पा सरवदे व सुखदेव बाबासो सरवदे यांना समसमान म्हणजे ४५ मते मिळाल्याने चिट्टी द्वारे सताधारी गटाचे निवृत्ती आप्पा सरवदे यांचे नशीब फुलले व त्यांना विजयी घोषित करण्यात आले.