घाटनांद्रे सर्वोदय हायस्कूलचे विद्यार्थी तब्बल तेवीस वर्षानी शाळेत

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सर्वोदय हायस्कूल घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील सन २००१ ते २००२ च्या इयत्ता दहावीतील तात्कालीन विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर नुकतेच शाळेच्या आवारात पार पडले.यावेळी तात्कालीन विद्यार्थ्यां,आजीमाजी शिक्षक,शिकक्षोतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितहोते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी एस शिंदे होते.ज्या शाळेत आपण शालेय शिक्षण घेतले.त्याच शाळेत तब्बल तेवीस वर्षानंतर आल्याने व त्यावेळीच्या तात्कालीन वर्गमित्र मैत्रिणींना भेटल्याचा आनंद हा या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर काही ओसंडूनच वाहात होता.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पुजनासह दीपप्रज्वलन केले. यावेळी तात्कालीन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही त्यावेळच्या आठवणी विशद करताना सदर विद्यार्थ्यांनी केलेल्या खोड्या,त्यांना आलेल्या अडचणी,तात्कालीन व सध्याच्या परिस्थितील तफावत विशद केली. यावेळी या विद्यार्थ्यांनीही तात्कालीन झालेल्या चुकांची जणू स्पष्ट कबूलीच दिली.तेवीस वर्षानंतर शाळेत आल्याने यांना काही वेळ का होईना आपण विद्यार्थी झाल्याचा भास झाल्याचा त्यांना जाणवत होता.दिवसभरच्या गप्पाटप्पा,हास्यविनोदा बरोबरच काही काळ का होईना शालेय आठवणीत हे विद्यार्थी रमुन गेले होते.
माजी विद्यार्थी मेजर दिपक शिंदे यांनी स्वागतपर भाषणात तात्कालीन शालेय आठवणींचा जणू आढावाच घेतला.तर संतोष शिंदे यांनी प्रत्येकांचा पुन्हा सर्वाना परिचय करून दिला.हिम्मत शिंदे, सविता शिंदे,शारदा शिंदे,शिक्षक सर्वश्री प्रकाश वाघमोडे,जयसिंग बोबडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर मुख्याध्यापक बी एस शिंदे यांनी आजवरचा शाळेच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील दिशा यावेळी स्पष्ट केली.
तदनंतर सदर विद्यार्थ्यांनी त्यावेळीच्या आपल्या वर्गात जाऊन बसलेल्या बेंचजवळ जाऊन व आवारात फेरफटका मारुन आठवणी जाग्या केल्या.त्यानंतर सदर विद्यार्थ्यांनी पन्नास हजार रुपये किमतीचे सॅनिटरी नॅपकिनचे मशीन शाळेसाठी भेट केले.तदनंतर उपस्थित शिक्षकांसोबत यथोचित भोजनाचा स्वाद घेतला.
पण शाळेस व उपस्थित शिक्षक व मित्रांना निरोप देताना मात्र सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पानवल्या.यावेळी मुख्याध्यापक बी एस शिंदे शिक्षक सर्वश्री लक्ष्मण लवटे,प्रकाश वाघमोडे,भारत काळे, दिलीप खाडे,जयसिंग बोबडे,श्रीम शोभा,शिंदे,शिक्षकेतर कर्मचारी सचिन पाटील,औदुंबर सुतार,शहाजी शिंदे त्याचबरोबर विद्यार्थी सर्वश्री दिपक शिंदे,संतोष शिंदे,समीर मुजावर,हिम्मत शिंदे,प्रविण भोसले,महादेव उर्फ बंडू शिंदे,विनायक शिंदे,विशाल शिंदे,महेश शिंदे,शिवाजी मोरे,सुरेश शिंदे,संतोष रास्ते,बाळासाहेब रास्ते,विकास सुतार,सविता शिंदे,ओजिस्विनी शिंदे,शारदा शिंदे,सुषमा देसाई, सुषमा कांबळे,उज्वला शिंदे,निर्मला शिंदे,वंदना शिंदे,मनिषा शिंदे,संगीता कोळी, सविता शिंदेसह तात्कालीन विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!