दुधगावचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष कै.विठ्ठलदादा यादव यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम सोहळा दुधगाव येथे दिनांक २१रोजी आयोजन

नवचैतन्य टाईम्स(डॉ.कुलदिप यादव)-महाबळेश्वर तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अजातशत्रू आणि हुशार व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बी. सी, ओ.बी.सी सेलचे-तालुकाध्यक्ष,मधुसागर मधोत्पादक संस्थेचे-संचालक,भारतीय बौद्ध महासभेचे शाखा क्र.१ चे माजी अध्यक्ष,रामवरदायनी मजूर सोसायटीचे माजी संचालक,दुधगाव गांवचे सलग सरपंच आणि १०५ समाजचे मजबुत कार्यकर्ते, गावकी-भावकीत माहिर असे स्मृतिशेष विठ्ठल हरीभाऊ यादव यांचे मागील वर्षी दुधगाव येथे शेतीचे काम करत असताना अपघाती निधन झाले.
संपुर्ण यादव कुटुंबीय आणि १०५ समाजव्यवस्थेत हा काळाचा फार मोठा आघात झाला.
संपुर्ण कोयना विभाग विठ्ठल दादांच्यासाठी आजही हळहळतोय.
तरी त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या कुटुंबातील पर्यावरण संवर्धनाच्या प्रथेप्रमाणे घरातील मयत व्यक्तीची आठवण कायम रहावी म्हणुन पिंपळाचे झाड लावायची प्रथा खुप वर्षापासून रुजू केलीये.
त्याचाच भाग म्हणुन मंगळवार, दिनांक २१/११/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता मु. दुधगाव, ता. महाबळेश्वर येथे श्रीलंका येथील बोधीवृक्षाच्या पासुन तयार केलेले पिंपळाचे झाडाचे यावेळेस तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते सदर बोधीवृक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. अशी माहिती पुतणे आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुलदिप यादव यांनी दिली.
तरी याप्रसंगी विठ्ठलदादांच्या सहवासातील धार्मिक, सामाजिक, राजकीय, पै-पाहुणे आणि आप्तेष्ट यांनी दुधगाव येथे उपस्थिती द्यावी अशी विनंती संपुर्ण यादव कुटुंबीय आणि दुधगाव ग्रामस्थांनी केलेली आहे.

error: Content is protected !!