आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयचा स्नेह मेळावा संपन्न

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)– आज दि. १६ नोव्हेंबर रोजी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय (आटपाडी कॉलेज आटपाडी) माजी विध्यार्थी संघ आटपाडी आयोजित माजी विध्यार्थी–विधार्थिनी स्नेह मेळावा व्यंकटेश माडगुळकर सभागृह आटपाडी येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व माजी विध्यार्थी–विधार्थिनी यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तद नंतर सर्व उपस्थित माजी विध्यार्थी–विधार्थिनी यांनी स्व:ताचा परिचय दिला. यावेळेस उपस्थिती माजी विध्यार्थी डॉ.बजरंग कुंभार,मा. ज्ञानेश्वर राक्षे, युवा उद्योजक मा. किशोर जाधव,प्रा.गणेश माने सर, ॲड.रामचंद्र इनामदार, मा.कुबीर सर, मा.नरेंद्र दिक्षित, मा.भुते सर,पाणी फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हा विभागीय अध्यक्ष मा.सत्यवान देशमुख ,विद्यार्थीनी सौ माधुरी शिंदे आदीनी आपल्या कॉलेज जीवनाच्या आठवणीना मनोगतातून उजाळा दिला.
उपस्थित माजी विध्यार्थी–विधार्थिनी यांना श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव भोसले,मा.प्राचार्य जे आर चव्हाण सर, प्रा.दिनेश भिंगे,माजी-विद्यार्थी संघ अध्यक्ष ॲड. चेतन जाधव,उपाध्यक्ष दिनेश देशमुख,सचिव प्रा.सदाशिव मोरे, प्रा.संजय हजारे सर,ॲड.विजय सावंत,ॲड.केदार भिंगे आदीनी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.सदर स्नेह मेळाव्यासाठी मुंबई, पुणे सोलापूर इत्यादी ठिकाणहून माजी विध्यार्थी–विधार्थिनी लक्षणीय उपस्थिती दर्शवली होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले सर होते.उपस्थित सर्वांचे आभार ॲड.चेतन जाधव यांनी मानले.

error: Content is protected !!