आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्तिक यात्रेत मेंढपाळांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- मा.अंकुश मुढे कार्याध्यक्ष मेंढपाळ आर्मी

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)आटपाडी तालुक्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली कार्तिक यात्रा दि.२५ व २६,२७ नोव्हेंबर रोजी आटपाडी येथे पार पडणार आहे. या यात्रेत मेंढपाळांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे मत मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुश मुढे यांनी व्यक्त केले आहे.ते बोलताना म्हणाले शुक्र ओढ्यामध्ये अपुरा जागा असल्याने,व शेळ्या मेंढ्याच्या आरोग्यास धोका असल्याने यात्रा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरायला हवी होती. परंतु आटपाडीतील छोटे मोठे व्यावसायिक यांचे हित जपण्यासाठी मेंढपाळांना घाणीत लोटले जातेय का याचा विचार व्हावा. शुक्र ओढ्यामध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे तसेच या यात्रेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेशमधुन मेंढपाळ सहभागी होतात.त्यांना या ठिकाणी कोणत्याही सुविधा मागिल वर्षी देण्यात आलेल्या नाहीत कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्र ओढ्यामध्ये कोणताही खर्च करत नाही. आणि आटपाडी नगरपंचायत देखील आम्हाला यातुन उत्पन्न नसल्याचे सांगत हात झटकत असते. त्यामुळे सोयीसुविधांचा प्रचंड अभाव जाणवतो .महाराष्ट्रातील सर्वात मोठी माडग्याळ मेंढ्यांची यात्रा आटपाडीत भरते.या यात्रेचे पावित्र्य आणि ओळख पुसली जाऊ नये याकडे लक्ष द्यावे.अपुऱ्या जागेमुळे या शेळ्या मेंढ्याच्या यात्रेला लागुन घोड्यांचा बाजार भरायचा तो मोडकळीस आला आहे.मागिल वर्षी या यात्रेतुन पशुपालक शेतकऱ्यांचे पशुधन चोरीस गेले आहे.या यात्रेत गतवर्षी मेंढपाळांना कोणत्याही सोयीसुविधांचा अभाव होणार नाही,याची जोखीम कृषी उत्पन्न बाजार समिती व नगरपंचायत आटपाडी यांनी घ्यावी असेही मुढे बोलताना म्हणाले.
शुक्र ओढ्यात अपुरा जागा असल्याने या ठिकाणी कार्तिक यात्रे निमित्त भरणारा घोड्यांचा बाजार मोडकळीस आलेला आहे.व्यापारी व व्यावसायिक यांचे व्यवसाय टिकविण्यासाठी मेंढपाळांना घाणीत लोटुन शेळ्या मेंढ्याची यात्रा मोडकळीस आणु नये असे आवाहन
मेंढपाळ आर्मीचे कार्याध्यक्ष अंकुश मुढे यांनी केले आहे.

error: Content is protected !!