तिसंगी येथे मराठा समाजाचे साखळी उपोषण अद्याप सुरुच

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर:-(जालिंदर शिंदे)घाटनांद्रे, तिसंगी,वाघोली,कुंडलापुर,रायवाडी व जरंडी या सहा गावच्या सकल मराठा समाजाच्या वतीने तिसंगी (ता कवठेमहांकाळ) या मध्यवर्ती ठिकाणी मराठा आरक्षणसाठीच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून सुरू असलेले साखळी उपोषण अद्यापही सुरूच असून सदर उपोषणचा काल सोमवार दिनांक २० नोव्हेंबर हा २६ वा दिवस होता.एसटी स्टाॅड परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनात बहुसंख्येने मराठा समाज बाधव सक्रिय झाले आहेत.सदर उपोषण स्थळ हे नेहमी गजबजलेले असते.येथे भेटी देणार्यांची संख्याही लक्षणीय असते.
सदर उपोषण स्थळी भेट दिली आसता प्रवक्ते व तिसंगी गावचे माजी सरपंच वामन (चाचा) कदम म्हणाले की जो पर्यंत मराठा समाजाला कायदेशीर रित्या व भक्कम असे आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण स्थळ सोडणार नसल्याचे सांगितले.
यावेळी वामनराव कदम,राजेंद्र पाटील,दिपक गायकवाड,जेष्ठ नागरिक कृष्णा पाटील,दिपकराव शिंदे(वाघोली),विश्वासराव पाटील ,संभाजी पाटील,सयाजी पाटील,सुभाष कांबळे,कृष्णा खिलारे ,मोहन कोळी,राहुल पोळ,योगेश पोळसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!